शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"मी बंडखोरांचे कार्यालय फोडायला जाऊ का?" चंद्रकांत खैरेंच्या हतबल उद्गारामुळे संघटनेच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 07:09 IST

जिल्ह्यात सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरावर हल्ले व्हायचे, या वेळी संघटना इतकी शांत कशी? या प्रश्नावर संघटना कशासाठी आहे? पदाधिकारी काय करीत आहेत, असे म्हणत त्यांनी जिल्हाप्रमुख दानवे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडे इशारा केला. 

औरंगाबाद : जिल्ह्यात शिवसेनेचा एखादा नगरसेवक, पदाधिकारी जरी फुटला तरी त्याच्याविरोधात रान पेटविले जायचे. शिवसैनिक रस्त्यावर उतरून त्या बंडखोरासह कुटुंबीयांना सळो की पळो करून सोडायचे, मात्र, आता जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंड करूनही स्थानिक पातळीवर शांतताच आहे. त्याबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी नाराजी व्यक्त केली. नेता म्हणून मी बंडखोरांची कार्यालये फोडायला जाऊ का, असा उलट सवाल करीत संघटनेतील आळीमिळी गुपचिळीला वाचा फोडली.

जिल्ह्यात सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरावर हल्ले व्हायचे, या वेळी संघटना इतकी शांत कशी? या प्रश्नावर संघटना कशासाठी आहे? पदाधिकारी काय करीत आहेत, असे म्हणत त्यांनी जिल्हाप्रमुख दानवे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडे इशारा केला. 

मला ५० कोटींची ऑफरमला कुणकुण लागली होती. मी थेट औरंगाबादकडे निघालो होतो. मोबाइल बंद केला होता. शिंदे गटाकडून संपर्क झाला. पण मी कुणाचेही नाव घेऊ इच्छित नाही. मला ५० कोटींची ऑफर होती, गद्दार म्हणून जगायचे नाही. - उदयसिंग राजपूत, शिवसेना आमदार, कन्नड

शिरसाटांनी बांधली बंडखोरांची ‘मोट’औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांच्या बंडखोरीचे सूत्रधार आ. संजय शिरसाट असून त्यांनीच पाच आमदारांची बंडखोरीसाठी ‘मोट’ बांधल्याचा खळबळजनक दावा या वेळी चंद्रकांत खैरे यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी घरगुती कामांसह दिवाळीला भेटवस्तू देत मतदारसंघातील कामांना कोट्यवधींचा निधी देऊन आमदारांना आपलेसे केल्याचेही खैरेंनी नमूद केले.   

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे