शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

पाणीवाटपामध्ये दौैंडवर कायमच अन्याय

By admin | Updated: March 6, 2017 01:26 IST

धरणातील पाण्याचा हक्क हा प्रथम दौंडकरांचा आहे.

वरवंड : दौंड तालुक्यामध्ये सर्वांत जास्त पुनर्वसन झाले आहे. यामुळे धरणातील पाण्याचा हक्क हा प्रथम दौंडकरांचा आहे. मात्र, पाणीवाटपामध्ये ग्रामीण भागावर नेहमीच अन्याय का होतो, असा सवाल दौैंडमधील शेतकऱ्यांनी केला.वरवंड येथे पाणी नियोजन बैठक आयोजित केली होती. यात उपस्थितांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.खडकवासला धरणातून मिळणाऱ्या हक्काच्या पाण्यासाठी वारंवार झगडावे लागत आहे. साखळी पद्धतीने पाणी मिळत असते. मात्र, हे पाणी सहजासहजी मिळणे आता शक्य राहिलेले नाही. कारण वारंवार या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे.बैैठकीत भीमा पाटसचे माजी संचालक महेश भागवत बोलताना म्हणाले, की फेब्रुवारीनंतर पाण्याची चर्चा सुरू होते. खडकवासल्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याशिवाय पाणी मिळणे शक्य नाही. मात्र, पाणीवाटपामध्ये ग्रामीण भागावर अन्याय का होत आहे? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुण्याची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे, त्यांनी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, यामुळे आपले पाणी कमी होत आहे. पुणे शहराला मुळशी धरणातून पाणी उपलब्ध होऊ शकते. खडकवासल्याचे पाणी आपल्या हक्काचे आहे.भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर म्हणाले, की पाणी हे जीवन आहे. आंदोलन करण्यात आमचे आयुष्य गेले आहे. त्या पाण्यावर ग्रामीण भागातील जनतेचा अधिकार आहे. याबाबत न्यायासाठी जलआयोग व न्यायालयात आपल्याला जावे लागणार आहे.या वेळी सत्वशील शितोळे, अशोक फरगडे, किशोर दिवेकर, लक्ष्मण दिवेकर, राजेंद्र देशमुख, विठ्ठल दिवेकर, केशव दिवेकर, दत्तात्रय दिवेकर, योगिनी दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी शेतकरी अंकुश दिवेकर, वाल्मीक सातपुते, मनोहर सातपुते, संदीप दिवेकर, सतीश राऊत, सरपंच संजय खडके, उपसरपंच नाना शेळके, शिवाजी शेलार, दिलीप दिवेकर, बापू बारवकर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)