शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

खड्डे चुकविण्यासाठी वापरा पर्यायी मार्ग; पुणे बायपास, कोल्हापूर मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 07:38 IST

गणरायाच्या स्वागतासाठी कोकणात रस्ते मार्गे जाणाऱ्या प्रवाशांकडून पुणे बायपास आणि कोल्हापूर मार्ग हा चांगला पर्याय उपलब्ध आहे.

मुंबई : गणरायाच्या स्वागतासाठी कोकणात रस्ते मार्गे जाणाऱ्या प्रवाशांकडून पुणे बायपास आणि कोल्हापूर मार्ग हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्डे चुकविणे शक्य होणार असून, प्रवाशांचा प्रवास काही अंशी सुखदायी होईल, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्ग, पाली-खोपोली मार्ग, सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग या मार्गांवरून चाकरमानी गावी जातात. मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे वाहतूककोंडी होण्याची शक्यता असते. मुंबई-कोकण मार्गावरील रस्त्यांची चाळण झाल्यामुळे कोकणात जाणाºया खासगी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्यावर भर दिला आहे.राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) रश्मी शुक्ला यांनी गणेशोत्सव काळातील रस्ते मार्गावर करण्यात येणाºया उपाययोजनांबाबत आढावा घेतला. या बैठकीस वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक विजय पाटील उपस्थित होते. या वेळी शुक्ला यांनीदेखील मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नाराजी व्यक्त करत कोकणात जाणाºया रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या.दादर येथील खासगी वाहतूक करणाºया चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले की, पेणपर्यंत नेहमीच्या मार्गाने आम्ही प्रवासी वाहतूककरतो. मात्र, तळ कोकण, कणकवली, मालवणमध्ये जाण्यासाठी मुंबई-कोल्हापूर-बंगळूर महामार्ग वापरून गगनबावडा, तळेरे मार्गे कणकवली असा प्रवास पूर्ण करतो. बुकिंग करताना प्रवाशांना याची कल्पना देण्यात येते. प्रवाशांनी देखील खड्ड्यांच्या झटक्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी या पर्यायी मार्गाला चांगला प्रतिसाद दिलाआहे.डबलडेकर एक्स्प्रेसला १२ दिवस अतिरिक्त बोगीलोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव डबलडेकर एक्स्प्रेसला १२ दिवस अतिरिक्त बोगी जोडण्याच्या निर्णयामुळे लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जाणाºया चाकरमान्यांना कोकण रेल्वेने दिलासा दिला. त्यामुळे ९ ते २२ सप्टेंबर या काळात डबलडेकर एक्स्प्रेस अतिरिक्त बोगीसह धावणार आहे. ट्रेन क्रमांक ११०८५ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव डबलडेकर एक्स्प्रेसला ९, १२, १४, १६, १९ आणि २१ सप्टेंबर प्रत्येकी दोन वातानुकूलित चेअरकार जोडण्यात येईल. ट्रेन क्रमांक ११०८६ मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस डबलडेकर एक्स्प्रेसला १०, १३, १५, १७, २० व २२ सप्टेंबर रोजी प्रत्येकी दोन वातानुकूलित बोगी जोडला जाणार आहेत.दरम्यान, पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई-अहमदाबाद डबलडेकर एक्स्प्रेसला सोमवार, ३ सप्टेंबरपासून एक वातानुकूलित डबल डेकर बोगी कमी करण्यात येईल. ३१ आॅक्टोबरपर्यंत मुंबई-अहमदाबाद डबलडेकर एक्स्प्रेस १३ बोगीसह धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.हे मार्ग वापरणे सोईस्कर...- नागोठणे ते महाडपर्यंत जाणाºयांनी मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करून खोपोली राज्य महामार्ग ९२ वरून पालीमार्गे नागोठण्याला पोहोचावे.- महाड ते चिपळूण जाणारे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गे शिरवळ फाट्यावरून राज्य महामार्ग ७० वरून महाड किंवा पोलादपूरवरूनखेड येथे जाता येईल.- चिपळूणच्या पुढे जाणारे वरीलपैकी कोणताही किंवा मुंबई कोल्हापूर बंगळूर द्रुतगती महामार्ग वापरून उंब्रज फाट्यावरून पाटणमार्गे चिपळूण मार्गाचा वापर शक्य आहे.- तळकोकण कणकवली मालवणला जाण्यासाठी मुंबई कोल्हापूर बंगरुळ द्रुतगती महामार्ग कोल्हापूर शहरातून गगनबावडामार्गे वैभववाडी तळेरे मार्गाचा वापर करा.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र