शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

मेळघाटात पोषण आहार वितरणासाठी लवकरच पर्यायी व्यवस्था; अंगणवाड्या बंद असल्याने कुपोषणात वाढ होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 3:47 PM

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सोमवारपासून पुकारलेल्या संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना केला जाणारा पोषण आहाराचा पुरवठा बंद झाला आहे.

ठळक मुद्दे राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सोमवारपासून पुकारलेल्या संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना केला जाणारा पोषण आहाराचा पुरवठा बंद झाला आहे. माता-बालमृत्यू आणि कुपोषणाचा सामना करणाऱ्या मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात पोषण आहार बंदमुळे कुपोषणात वाढ होण्याची शक्यतापोषण आहार पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपातळीवर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो. 

परतवाडा, दि. 13- राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सोमवारपासून पुकारलेल्या संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना केला जाणारा पोषण आहाराचा पुरवठा बंद झाला आहे. परंतु माता-बालमृत्यू आणि कुपोषणाचा सामना करणाऱ्या मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात पोषण आहार बंदमुळे कुपोषणात वाढ होण्याची शक्यता असल्याने पोषण आहार पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपातळीवर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो. 

राज्यात सोमवारपासून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा राज्यव्यापी संप सुरू झाल्यापासून म्हणजे मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यासह विशेषत: मेळघाटात २० हजारांवर आदिवासी मुले व स्तनदा आणि गर्भवती मातांना दररोज दिला जाणारा पोषण आहार बंद झाला आहे. पूरक पोषण आहाराअभावी बालकांच्या कुपोषणात वाढ होण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मेळघाटाची परिस्थिती वेगळी आहे. येथे पोषण आहार वितरण बंद राहिल्यास कुपोषणमुक्तीच्या प्रयत्नांमध्ये अडसर येऊ शकतो. कुपोषणात वाढ होऊन कुपोषित मुले कुपोषणाच्या तिस-या व चौथ्या श्रेणीत जाऊ शकते. ही शक्यता लक्षात घेता, मेळघाटाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी राज्यशासनासह जिल्हा प्रशासनाला विशेष दखल घेण्याची गरज आहे.

जिल्हास्तरावरही चर्चा अंगणवाडीतील सेवा या माता आणि बालकांच्या आहार आणि आरोग्याशी संबंधित असल्याने त्या अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यामुळे यासेवा पुरविणे अंगणवाडी सेविका मदतनिसांवर बंधनकारक आहे. म्हणूनच राज्य पातळीवर याबाबत सकारात्मक पावले उचलली जात असून याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. तर जिल्हा पातळीवरील संघटनेच्या नेत्यांशी पण चर्चा केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे महिला व  बाल कल्याण अधिकारी कैलास घोडके यांनी लोकमतशी बोलताना दिली. विशेषत: मेळघाटातील  अंगणवाडी सेविका व मदतनीसांसोबत सुद्धा चर्चा सुरू आहे. मेळघाटातील बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहार आणि आरोग्याची अत्यावश्यक बाब म्हणून सेवा देण्यास तयार असल्याची माहिती आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविकांच्या सतत संपर्कात आहेत. येत्या एक दोन दिवसात जिल्ह्यातील प्रश्न मिटला नाही तरी मेळघाटात पूर्ववत आहार वितरण सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.      

पोषण आहाराबाबत मेळघाटचा प्रश्न गंभीर आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संघटनेसोबत बोलणी सुरु आहे. लवकरच बालकांना व गर्भवती आणि स्तनदा मातांना पूर्ववत पोषण आहार पुरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.-कैलास घोडके, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, महिला, बालकल्याण विभाग, अमरावती