शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधीच आॅक्टोबर हीट, त्यात वीज गूल; भारनियमन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 04:14 IST

आॅक्टोबर हिटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे.

रत्नागिरी : आॅक्टोबर हिटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे. त्यामुळे सोमवारपासून काही ठिकाणी भारनियमनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने भारनियमनाचा प्रश्न इथूनपुढे आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.राज्यात सोमवारी १९ हजार ९९६ मेगावॅट विजेची मागणी होती. महावितरणकडून १४ हजार ८७० मेगावॅट विजेची उपलब्धता करण्यात आली. आॅक्टोबर हिटमुळे घरगुती, वाणिज्यिक त्याचबरोबर शेतीपंपांसाठीही विजेची मागणी वाढली आहे. पिके वाळण्याची भीती असल्यामुळे कृषीपंपाचा सर्वाधिक वापर होत आहे.राज्यातील औष्णिक प्रकल्पातंर्गत ५ हजार २३९ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातंर्गत १४०० मेगावॅट वीजनिर्मिती होते. केंद्रीय प्रकल्पातंर्गत ४ हजार ४५० मेगावॅट, सौर उर्जेतंर्गत ४११ मेगावॅट विजेची उपलब्धता होत आहे. अदानी कंपनीकडून २३३५ मेगावॅट, पवन उर्जेतून २७८ मेगावॅट, याशिवाय जिंदाल प्रकल्पातून २८७ मेगावॅट, रतन इंडिया प्रकल्पातून २७० मेगावॅट मिळून एकूण १४ हजार ८७० मेगावॅट विज निर्मिती होत असून तसा पुरवठा करण्यात येत आहे. मुंबईसाठी ३ हजार ३३० मेगावॅट विजेची मागणी असून त्यासाठी मुंबईतील निर्मिती केंद्रातूनच पुरवठा होत आहे.राज्यातील औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा भासत असल्याने विजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. याशिवाय पाण्याची पातळी खालावल्याने जलविद्युत प्रकल्पातून विजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे सोमवारी भारनियमन करण्यात आले. महावितरण खुल्या बाजारातून वीज खरेदी करून पुरवठा करीत आहे.- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, प्रकाशगड, मुंबई.

टॅग्स :mahavitaranमहावितरण