शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येची परवानगी द्या, नाहीतर नक्षलवादी बनतो : शेतकरी पुत्राचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 16:42 IST

Farmer's son's letter to CM वैभव बाबाराव मानखैर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता; मात्र त्याला कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही.जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार केला, पण त्याची दखल घेण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:   तालुक्यातील एका शेतकरी पुत्राने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. आत्महत्या करण्यास परवानगी देत नसाल, तर उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखविणार असल्याचा सूचक इशारा पत्रातून दिल्याने संग्रामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. काकोडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा पूत्र वैभव बाबाराव मानखैर याने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमुद आहे की, त्याने संग्रामपूर येथील महाराष्ट्र बँक शाखेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता; मात्र त्याला कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही. शिक्षणासाठी कर्ज मिळावे, या आशेवर त्याने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार केले. अकोला येथील बँकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांकडेही त्याने मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार केला, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. शैक्षणिक कजार्साठी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र बँक शाखा संग्रामपूरकडे केला असता बँक प्रशासनाने अर्ज नामंजूर करीत १२ वी ला ५९.२३ टक्के गूण असल्याने शैक्षणिक कर्ज देता येणार नसल्याचे कारण दिले. त्याने बारावीनंतर मेहनत घेऊन सीईटीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला चांगले गुण मिळाल्याने शासनाच्या कोट्यातून बी-फार्मला प्रवेश मिळणार होता. भविष्यात शैक्षणिक कर्ज घेऊन पुढील शिक्षण करण्याच्या हेतूने त्याने डी-फार्मला प्रवेश घेतला.  गत चार महिन्यांपासून महाराष्ट्र बँक शाखा संग्रामपूरकडे सतत पाठपुरावा करीत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली; मात्र शेतकरी पुत्राच्या हाती शेवटी निराशाच लागली. त्यामुळे त्याने प्रशासकीय यंत्रणेला वैतागून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आत्महत्या करण्यास परवानगी मागितली, अन्यथा नक्षलवादी बनण्याचा इशारा दिला. यामुळे खळबळ उडाली आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली खंत व्यक्तकेवळ शेतकरी पुत्र असल्याने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची खंत वैभवन ने पत्रातून  व्यक्त केली. शासनस्तरावरून दहा दिवसात उत्तर न मिळाल्यास उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखविण्याचा इशाराही पत्रामधून दिला आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरbuldhanaबुलडाणाUddhav Thackerayउद्धव ठाकरे