शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:20 IST

मुंबईतील रहिवासी महादू बेलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इच्छामरणाचा अधिकार देण्याची विनंती केली.

सरकार आमच्या मुलांना वाचवण्यास मदत करू शकत नसेल तर, किमान आम्हाला इच्छामरणाचा अधिकार द्या, अशी विनंती मुंबईतील रहिवासी महादू बेलकर यांनी पत्रातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. महादू बेलकर यांचा १५ वर्षांचा मुलगा तनेश बेलकर हा एसएसपीई या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे तनेशला खूप असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्याच्या असह्य वेदना पाहवत नाहीत. तसेच राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने महादू बेलकर यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली.

 महादू बेलकर यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "आमच्या मुलाला प्रत्येक मिनिटाला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. तो हालचाल किंवा बोलू शकत नाही. पालक म्हणून आम्हाला त्याच्या वेदना पाहवत नाहीत. सरकार त्याला वाचवण्यासाठी मदत करू शकत नसेल तर, आम्हाला इच्छामरणाचा अधिकार  द्या."

पुढे महादू बेलकर म्हणाले की, राज्यातील एकूण ६७ जण एसएसपीई या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत. तनेश बेलकर हा त्यापैकी एक आहे. काही अधिकाऱ्यांकडून सहानुभूतीच्या शब्दांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. एसएसपीई आजारावर उपचार करण्यासाठी लागणारा खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. आमची मुले मरत आहेत, परंतु कोणालाही काळजी वाटत नाही.सर्व अधिकारी त्यांच्या स्वतःच्या जगात व्यस्त असल्याचे दिसून येते. आम्हाला कुढत ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी सात वर्षांच्या ओवी पुरीचा मृत्यू झाला. ओवीच्या पालकांनी तिच्या आजारावर ३० लाखांपेक्षा अधिक खर्च केला. परंतु तरीही तिला वाचवू शकले नाहीत."

दरम्यान, २२ वर्षीय एसएसपीई रुग्ण रितिक जैन यांच्या आई मीनाबाई मांगीलाल जैन यांचे २३ जून रोजी निधन झाले. त्यांचे पती मांगीलाल हुकामीचंद जैन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा २०२० पासून एसएसपीई या आजाराने ग्रस्त आहे. मुलाची प्रकृती बिघडत चालली असून कोणीही मदत करत नसल्याच्या तणावातून माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. आता ते आपल्या दोन मुलांसह राहतात. आर्थिक परिस्थिती हलाक्याची असताना त्यांची कशी काळजी घ्यावी? जगण्यापेक्षा मरणे बरे वाटत आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र