शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयात घाेडा बांधायची परवानगी द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 06:39 IST

शासकीय कर्मचाऱ्याचे पत्र व्हायरल. वाढत्या महागाईबरोबरच इंधन दरवाढ डोकेदुखी ठरत असतानाच रोहयो विभागातील सहायक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांची घोडेसवारीला परवानगी मिळण्याची लेखी मागणी चर्चेचा विषय ठरला नसता तरच नवल.   

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : पूर्वीच्या काळी प्रवासासाठी घोड्यांचा वापर सर्रास केला जायचा. त्यांची जागा आता दुचाकी व चारचाकी गाड्यांनी घेतली आहे. मात्र, अशातही कुणी रोजच्या प्रवासासाठी घोडेसवारीची परवानगी मागत असेल तर तो नक्कीच चर्चेचा विषय ठरेल. नेमका हाच प्रकार नांदेडमध्ये घडला. येथील सहायक लेखाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागितल्याने हा विषय चर्चेचा ठरला. 

वाढत्या महागाईबरोबरच इंधन दरवाढ डोकेदुखी ठरत असतानाच रोहयो विभागातील सहायक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांची घोडेसवारीला परवानगी मिळण्याची लेखी मागणी चर्चेचा विषय ठरला नसता तरच नवल.   ३ मार्च रोजी देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून घोडे खरेदीसाठीची लेखी परवानगी मागितली. मला पाठीच्या कण्याचा त्रास आहे. त्यामुळे घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे. घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्याची परवानगी द्यावी अशी रितसर मागणी त्यांनी केली होती. मात्र हे पत्र व्हायरल झाले आणि राज्यभर चर्चा झाली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत देशमुख यांना कार्यालयीन समज दिल्यानंतर घोड्यासाठीची मागणी मागे घेत देशमुख यांना बुधवारी सायंकाळी लेखी माफीनामा सादर करावा लागला.  त्यामुळे हा विषय येथेच संपला. पण, यामुळे सोशल मीडियावर इंधन दरवाढीचा मुद्दाही चर्चेत आला होता. 

चर्चा मात्र इंधन दरवाढीचीच  n सतीश देशमुख यांच्या या पत्राची सांगड अनेकांनी वाढत्या इंधन दरवाढीशी घातली. इंधनाचे दर आवाक्याबाहेर गेल्याने नागरिक आता घोड्याकडे वळत आहेत. n त्यात देशमुख यांचे काय चुकले, असा प्रश्नही अनेकांनी समाजमाध्यमावर केला.

उलट मणक्याचा त्रास वाढतोघोड्यावरून प्रवास केल्याने पाठीचा त्रास उलट वाढतो. पाठीतील मणके आणि डिस्क घोडेसवारीमुळे दबतात. त्यामुळे कायमचे अपंगत्वही येऊ शकते.  - डॉ. राजेश अंबुलगेकर, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ 

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारीFuel Hikeइंधन दरवाढ