शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या रब्बीसाठी ३२.५० लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन, परतीच्या पावसाने क्षेत्रवाढ अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 16:59 IST

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात परतीच्या पावसाने सरासरी भरून काढली. त्यामुळे रब्बीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रब्बीसाठी ३२ लाख ५० हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

अमरावती,  दि. २६ -  विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात परतीच्या पावसाने सरासरी भरून काढली. त्यामुळे रब्बीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रब्बीसाठी ३२ लाख ५० हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. तसेच खरीप हंगामात पावसाची तूट असल्यामुळे खतांचा साठा शिल्लक होता. त्यामुळे यंदाच्या रब्बीमध्ये खतांचा मुबलक साठा शिल्लक राहणार आहे.राज्यातील मुंबई व उपनगर वगळता ऊर्वरित ३४ जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामासाठी ३२ लाख ५० हजार मे.टन खतांचे आवंटन मंजूर आहे. यामध्ये युरियासाठी सर्वाधिक ११ लाख ५० हजार मे.टनाचा समावेश आहे. डीएपी तीन लाख ५० हजार मे.टन, एमओपी दोन लाख मे.टन, एनपीके नऊ लाख ५० हजार मे.टन  व एसएसपी सहा लाख मेट्रिक टन खतांचा समावेश आहे. यंदाच्या खरिपात जून महिन्यापासून सर्वच जिल्ह्यात पावसाची तूट असल्याने खतांचा उठाव झालाच नाही. त्यामुळेही खतांचा साठा शिल्लक आहे. डिलरकडे ३१ मार्च २०१७ अखेरचा तसेच नॉन बफर स्टॉकमधील साठा आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठीदेखील रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आल्यामुळे खतांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणे व हंगामात खतांची भाववाढ करून शेतक-यांची अडवणूक करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. यंदाच्या रब्बीसाठी रासायनिक खतांचे सर्वाधिक दोन लाख ३१ हजार ६०० मे.टनाचे आवंटन अहमदनगर जिल्ह्यासाठी मंजूर आहे, तर सर्वात कमी आवंटन सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या युरियाची टंचाई यंदा भासणार नाही. युरियासाठी सर्वाधिक एक लाख मे.टनचे आवंटन सोलापूर जिल्ह्यासाठी, तर सर्वात कमी चार हजार मेट्रिक टनचे आवंटन ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे.

 जिल्हानिहाय मंजूर खतांचे आवंटनयंदाच्या रब्बीसाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी २,३१,६०० मे.टन, अकोला ५५,२००, अमरावती ९०,९००, औरंगाबाद १,६१,०००, भंडारा ४१,२००, बीड १,०३,६००, बुलडाणा १,३६,५००,चंद्रपूर ४४,९००, धुळे ६८,७००,गडचिरोली २५,७००, गोंदिया ३६,९००, हिंगोली ४०,३००, जळगाव २,२८,७००, जालना १,२४,२००, कोल्हापूर १,८०,६००,लातूर ६४,६००, नागपूर ८४,५००, नंदूरबार ६८,०००, नाशिक १,८९,२००, उस्मानाबाद ३५,२००, पालघर १०,०००,  परभणी ५६,८००,पूणे २,३०,९००, रायगड १०,०००, रत्नागिरी ८२,०००, सांगली १,३१,४००, सातारा १,०६,६००, सिंधुुदुर्ग ४,७००, सोलापूर १,९६,८००, ठाणे १२,२००, वर्धा ७६,५००, वाशिम ४५,९०० तर यवतमाळ जिल्ह्यासाठी १,१९,८०० मे.टन साठा मंजूर करण्यात आला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार