शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांत काेट्यवधींची अनामत रक्कम पडून, कॉप्स संघटनेचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 03:50 IST

colleges : अनामत रकमेचा उपयोग व्हावा यासाठी ती ईबीसी विद्यार्थ्यांच्या विविध गरजांसाठी वापरावी, अशी मागणी त्यांनी राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण संचालकांना केली.

मुंबई : राज्यातील विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना ठरावीक रक्कम अनामत म्हणून घेतात. अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ती महाविद्यालय प्रशासनाकडे जमा असते. त्यानंतर नियमावलीनुसार ती विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक महाविद्यालये ती परत देत नसल्याने राज्यातील ३,१४१ महाविद्यालयांत अशी ५०० कोटींहून अधिक अनामत रक्कम पडून असल्याचा दावा कॉप्स (केअर ऑफ पब्लिक सेफ्टी) संघटनेचे कार्यालयीन अधीक्षक अमर एकाड यांनी केला.      या अनामत रकमेचा उपयोग व्हावा यासाठी ती ईबीसी विद्यार्थ्यांच्या विविध गरजांसाठी वापरावी, अशी मागणी त्यांनी राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण संचालकांना केली. ईबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात अनेकदा आर्थिक मदत अपुरी पडते. त्यामुळे ईबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह व मेस शुल्क, शैक्षणिक साहित्य - वह्या, पुस्तके, दफ्तर इ., वैद्यकीय सुविधा, कमवा व शिका योजनेसाठी निधी उपलब्ध करणे, अशा ४ घटकांवर ही रक्कम खर्च करण्याचे परिपत्रक काढून तत्काळ अंमलबजावणीची मागणी एकाड यांनी संचालक व सर्व विभागीय सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण यांच्याकडे केली.

काही महत्त्वाच्या महाविद्यालयांकडे असलेली अनामत रक्कम१)    जय हिंद महाविद्यालय, मुंबई     ५२,५०,५१०/-२)    लाला लजपतराय महाविद्यालय, मुंबई     ६६,९५,८१०/-३)    चेतना महाविद्यालय, मुंबई     ३८,९९,३८२/-४)     एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई     ३३,३३०००/-५)     के.सी. महाविद्यालय, मुंबई      ४२,३५,११५/-६)     मॉडर्न महाविद्यालय, पुणे      १४,२८,४३०/-  ७)     फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे      ११,७३,१००/-८)     आनंद निकेतन महाविद्यालय, चंद्रपूर      ५,२७,२४२/-९)     लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालय, सिंधुदुर्ग      ४,२८,२८४/-१०)     कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय रायगड      १५,७७,८९६/ -

टॅग्स :collegeमहाविद्यालय