शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंच्या उपस्थित पक्षप्रवेश, भुसेंसोबत कनेक्शन; ड्रग्समाफियावरून राजकारण रंगलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 13:42 IST

कुणाच्या सांगण्यावरून आरोपीला रुग्णालयात दाखल केले? याची उत्तरे समोर आली पाहिजेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

मुंबई – पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्समाफिया ललित पाटील याच्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच राजकारण रंगलं आहे. ललित पाटील आणि दादा भुसे कनेक्शनवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले. त्यानंतर ललित पाटील याचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश झाल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर दादा भुसे यांनीच ललित पाटीलला शिवसेनेत आणले असा आरोप केला जात आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, नाना पटोलेंनी नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन नाशिकमधील शिंदे गटातील आमदारांचा हात आहे म्हटलं, काल पुण्यातील काँग्रेस आमदाराने मंत्र्याचा हात असल्चाचे सांगितले. मी राजकीयपेक्षा सामाजिक हिताला जास्त महत्व देते. तरुणाईची मला चिंता आहे. नाशिक-शिंदे गट आणि मंत्री असं कनेक्शन येत असेल तर तिथे दादा भुसे आहेत. त्यांनी माघार घेऊ नये, चौकशी करावी असं मी म्हटलं. दादा भुसे चौकशीला तयार असून गृहमंत्री काय बोलत नाही. इतक्या गंभीर प्रकरणावर न बोलता टोलवर विषय भरकवटता. मी राजकीय आरोप केले नाही. दादा भुसेंना मी व्यक्तिश: भेटली नाही. मला राजकीय फायदा घ्यायचा नाही. काही संबंध नाही. नाशिक आणि शिंदे गट असं कनेक्शन पुढे येत असेल तर नाशिकचे शिंदे गटाचे दादा भुसे आहेत. एखाद्या रुग्णाला सलग ९ महिने उपचारासाठी दाखल केले जात नाही. कुणाच्या सांगण्यावरून आरोपीला रुग्णालयात दाखल केले? याची उत्तरे समोर आली पाहिजेत असं त्यांनी म्हटलं.

तसेच जो फोटो व्हायरल झाला, त्यात उद्धव ठाकरे होते, एखादी व्यक्ती ज्या जिल्ह्यातून पक्षात येते, त्या जिल्ह्यातील मोठे नेते त्यांना घेऊन येतात. ललित पाटील याला दादा भुसेंनीच मातोश्रीवर आणले होते. असाच फोटो जयसिघांनी प्रकरणावेळीही समोर आले होते. तेव्हा एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून ते आले होते. माझा विवेक जागा ठेवत शब्दछळ न करता ससूनमधील माजी डीन, आत्ताचे डीन आणि स्टाफ यांची चौकशी झाली पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी मागणी केली.

नाशिक शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखाने आरोप फेटाळला

पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर जे सुषमा अंधारे यांनी आरोप केले, त्यात आम्ही काही फोटो माध्यमांना दिले त्यात ललित पाटील आणि भूषण पाटील यांचा उबाठा गटातील नेत्यांसोबत संबंध असल्याचे दिसते. या नेत्यांची चौकशी होणे गरजेचा आहे. सुषमा अंधारेंनी हे फोटो पाहावेत आणि पालकमंत्री भुसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप  करू नये. उबाठा गटाचे जे नेते आहेत त्यांचे ललित पाटील यांच्याशी संबंध काय आहेत यावर सुषमा अंधारेंनी मागणी करावी. या प्रकरणाची चौकशी व्हावी असं नाशिकचे शहरप्रमुख प्रविण तिदमे यांनी प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDrugsअमली पदार्थ