शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

'या' सर्व नेत्यांसह अखेर फडणवीसही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 17:23 IST

अखेरीस मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यातील विरोधीपक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई - भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नेते असताना मजल दर मजल करत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांना अल्प मतात का होईना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपण पुन्हा येईल ही घोषणा खरी ठरवली होती. परंतु, राज्यात झालेल्या राजकीय भुकंपामुळे ज्याप्रमाणे भाजपचे इतर नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतातून बाहेर गेले, तसच काहीसं आता फडणवीस यांच्यासोबतही झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आणत भारतीय जनता पक्षाने राज्यात 2014 मध्ये सत्ता मिळवली. अनेक दिग्गज नेत्यांनी वर्षानुवर्षे दिलेल्या लढ्यानंतर भाजपला आपला मुख्यमंत्री विराजमान करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नेते इच्छूक होते. मात्र मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडली. फडणवीसांच्या पाच वर्षांच्या काळात भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठीचे सर्व इच्छूक हळूहळू गायब झाले आणि केवळ फडणवीस उरले होते. मात्र शिवसेनेची आक्रमक भूमिका आणि पवारांची खेळी यामुळे केवळ फडणवीसच नव्हे तर भाजपही सत्तेतून बाहेर फेकले गेले. 2014 पूर्वी भाजपकडून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर कन्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक होते. मात्र भाजप नेतृत्वाने फडणवीस यांनाच झुकते माप दिले. तेव्हापासून भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत लागली होती. मात्र 2019 येईपर्यंत हे सर्वच नेते शर्यतीत मागे पडले. तर चंद्रकांत पाटील यांच नाव पुढं आलं. मात्र 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी पाटील यांना रोखून धरत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळविण्यात बाजी मारली. मात्र त्यांची दुसरी टर्म आठ दिवसही चालू शकली नाही. ज्यांच्यामुळे नवीन सरकार घाईघाईने स्थापन करण्यात आले, त्या अजित पवारांनीच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि फडणवीसांचे स्वप्न भंग झाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भरवशावर भाजपशी हात मिळवली केली होती. मात्र आमदार सोबत राहिले नसल्याने भाजप सरकार कोसळले. अखेरीस मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यातील विरोधीपक्षनेतेपद आता कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.