शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

सगळाच सावळा गोंधळ! शेतकरी हिताच्या चर्चेसाठी शरद पवार राज्यसभेत नव्हते, चंद्रकांत पाटलांचा टोला

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 21, 2020 17:12 IST

शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा होत असताना 'जाणता राजा' म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेसाठी उपस्थित राहत नाहीत. यांना शेतकऱ्यांच्या हिताची परवा नाही. यांना स्वार्थ अधिक महत्त्वाचा वाटतो.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या हिताचा कायदा होत असताना 'जाणता राजा' म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेसाठी उपस्थित राहत नाहीत.यांना शेतकऱ्यांच्या हिताची परवा नाही. यांना स्वार्थ अधिक महत्त्वाचा वाटतोशिवसेनेला एका दिवसात काय साक्षात्कार झाला?

कोल्हापूर : राज्यसभेत रविवारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी, ही विधेयके मंजूर करण्यात आली. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेला जबरदस्त टोला लगावला आहे. 'शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा होत असताना 'जाणता राजा' म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेसाठी उपस्थित राहत नाहीत. तर शिवसेना लोकसभेत ज्या विधेयकांना पाठिंबा देते, त्याच विधेयकांना राज्यसभेत विरोध करते. हा सगळाच सावळा गोंधळ आहे. यांना शेतकऱ्यांच्या हिताची परवा नाही. यांना स्वार्थ अधिक महत्त्वाचा वाटतो," असे पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेला एका दिवसात काय साक्षात्कार झाला? -पाटील म्हणाले, संसदेत मंजूर झालेली ही विधेयके ही शेतकऱ्याच्या हिताची आहेत. मात्र, तरीही राजकीय विरोधासाठी विरोध म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने या विधेयकांना सभागृहात विरोध केला. शिवसेनेने तर या विधेयकांना पहिल्या दिवशी लोकसभेत पाठिंबाही दर्शवला होता आणि दुसऱ्या दिवशी मात्र राज्यसभेत विरोध केला. त्यांना एका दिवसात असा काय साक्षात्कार झाला? असा सवालही पाटील यांनी यावेळी केला. एवढेच नाही, तर खुद्द काँग्रेसनेच २०१९च्या निवडणूक जाहीरनाम्यात हा विषय मांडला होता. याची आठवण करून देत, मग ते आता या विधेयकाला विरोध का करत आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला.

...म्हणून अकाली दलाने केला विरोध -पंजाबमधील अकाली दलासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, पंजाबमध्ये बहुसंख्य बाजार समित्यांवर अकालीदलची सत्ता आहे. ही सत्ता जाऊ नये, म्हणून अकाली दलाने या विधेयकांना विरोध केला आहे. या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य कुटुंबातूनआले आहेत. त्यांना शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण आहे. ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे, असेही पाटील म्हणाले.

कंगनाने शब्द जपून वापरावेत -कंगना रणौतसंदर्भात बोलताना पाटिल म्हणाले, शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगना राणौतच्या मताशी आपण सहमत नाही. मात्र, अनेक वेळा तिची भूमिका योग्य असते, पण ती मांडण्याची पद्धत चुकीची आहे. तिने शब्द जपून वापरावेत, कुणाच्या भावना दुखावू नयेत. आपल्या बोलण्याने काय दुष्परिणाम होता, हे तिला कळत नाही, असेही पाटील म्हणाले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार