शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी अंमलबजावणीवर सर्वपक्षीय आमदारांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 07:50 IST

अद्याप ५४ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी असून, ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिले. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफी केली असली, तरी तिची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत सर्वपक्षीय आमदारांनी व्यक्त केली. अद्याप ५४ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी असून, ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर बोलताना सरकारने अद्यापही ३५ हजार ६२९ शेतकऱ्यांना १५६ कोटी रूपयांची कर्जमाफी दिली नसल्याचे निदर्शनास आणले. तर शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी कोरोना काळात कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाल्याने या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम वाढली असून, ती माफ करावी, अशी मागणी केली. काँग्रेसचे अमर राजूरकर यांनीही कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित असल्याचे म्हटले. कोरोनाकाळात निधीची कमतरता आणि आधार प्रमाणिकरणातल्या ५४ हजार शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी वगळता सुमारे ९७ टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, तर ५४ हजारपैकी ४५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असल्याने २०० कोटींचा निधी वर्ग केल्याचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. दरम्यान, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची घोषणा अर्थसंकल्पात केली असून, या आर्थिक वर्षातच लाभार्थी शेतकऱ्यांना  त्याचे वाटप होईल, अशी ग्वाही सहकार मंत्र्यांनी दिली.