शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व नगराध्यक्ष 'वर्षा'वर धडकणार, सामूहिक राजीनामे देणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:50 IST

राज्यातील सर्व नगराध्यक्ष हे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देऊन आपले सामूदायिक राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे  देणार आहेत

 - मनोहर कुंभेजकर

मुंबई - राज्यातील नगराध्यक्षांना पूर्वी प्रमाणे असलेले अधिकार मिळवेत या मागणीसाठी सर्व नगराध्यक्ष हे लवकरच मुख्यमंत्र्यांच्यावर्षा बंगल्यावर धडक देऊन आपले सामूदायिक राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे  देणार आहेत. असा ठराव आज राज्यस्तरीय नगराध्यक्षांच्या परिषदेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.राज्यात 367 नगरपरिषदा व नगरपंचायती आहेत. मे 2016 व मे 2018  रोजी नगरपरिषदा  कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल केल्यामुळे नगराध्यक्षांचे अधिकार कमी झाले असून . 2016 पूर्वी असलेले नगराध्यक्षांचे अधिकार मिळावेत या मागणीसाठी आता राज्यातील सर्व नगराध्यक्ष एकवटले असून या महिन्यात वर्षावर धडक देऊन राज्यातील सर्व नगराध्यक्ष सामूदायिक राजिनामे देणार असल्याची घोषणा आज मुंबईत अंधेरीत झालेल्या राज्यस्तरीय नगराध्यक्षांच्या परिषदेत करण्यात आली.अश्याप्रकरचा ठराव हा आम्ही एकमताने  मंजूर केला अशी माहिती नगरपरिषदा महासंघाचे अध्यक्ष व हिंगणघाट नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.यावेळी राज्यातील सुमारे 100 नगराध्यक्ष उपस्थित होते.

नगरपरिषदा कायदा 58(2) प्रमाणे पूर्वी नगरपरिषद कायद्यात नगराध्यक्षांना असलेले वित्तीय अधिकार राज्य शासनाने काढले आहेत, तर 77(1) कायद्यात आता पूर्वी असलेल्या नगराध्यक्षांच्या अधिकारात कपात करण्यात आली आहे.या कायद्यात पूर्वी  मुख्य अधिकारी हे नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार व त्यांच्या देखरेखीखाली काम करत असत.तसेच  नगराध्यक्षांचे मुख्य अधिकाऱ्यांवर नियंत्रण होते, तो अधिकार आता काढण्यात आला.तसेच त्याचा गोपनीय अहवाल लिहीण्याचे अधिकार जे नगराध्यक्षांना होते ते देखिल काढण्यात आले आहेत.नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला मुख्य  अधिकारी यांना हजर राहणे पूर्वी बंधनकारक होते,आता हे बंधन काढण्यात आले आहे.महापालिकेत असलेल्या आयुक्तांप्रमाणे आता नवीन कायद्याप्रमाणे मुख्य अधिकारी यांना अधिकार मिळणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यातील सर्व नगराध्यक्षांना पूर्वी प्रमाणे कलम 58(2)व कलम 77(1)प्रमाणे अधिकार मिळावेत या मागणीसाठी आपण 3 आमदार व 12  नगराध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर अधिवेशनात भेट घेतली होती.त्यावेळी सरकारने मे 2016 व मे 2018  मध्यें केलेल्या नगरपरिषदा कायद्यात केलेली दुरुस्ती रद्द करून पूर्वीप्रमाणे नगराध्यक्षांना अधिकार देऊ असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.मात्र अजून याबाबतीत काहीच पूर्तता झाली नाही.त्यामुळे ही टोकाची भूमिका नगरपरिषदा महासंघाला घ्यावी लागली असल्याचे त्यांनी सांगितले.लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्षांकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत,मात्र आम्हाला अधिकारच नसल्याने आमची अवस्था कुबड्यांप्रमाणे झाली आहे.याउलट नगरपरिषदांमधील मुख्य अधिकारी शिरजोड झाले असून ते राज्यातील नगराध्यक्षांना जुमानतच  नसल्याची टिका प्रेम बसंतानी यांनी शेवटी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र