शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सगळ्या मोदींनी देशाला छळले, फसवून पळालेले सर्व भाजपा समर्थक : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 08:02 IST

केंद्राने दहशतवाद्यांशी लढण्यासाठी हाफ पँट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना पाठवावे, म्हणजे त्यांना याचे तथ्यही कळेल.

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात ११ हजार कोटी रुपये घेऊन पळून गेला. देशाला फसवून जे - जे पळून गेले ते ते सगळे भाजपा समर्थक होते. या सगळ्या मोदींनी देशाला छळले आहे, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली.काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी वाडीकुरोली येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी बोलताना पवार यांनी भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. नीरव मोदी पळून गेल्यानंतर सरकार आता म्हणते त्याचा पासपोर्ट रद्द करू. २०१६ साली पंतप्रधान कार्यालयाला नीरव मोदी यांच्याबाबत आम्ही कळविले होते. चौकशी करून कारवाई करावी, असे सांगितले होते. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.मोदी प्रकरणाची सुरुवात यूपीएच्या काळात झाली, असे सांगितले जाते. मात्र, नीरव मोदीला एका रात्रीत ११ हजार कोटी कोणी मंजूर करणार नाही. हा विश्वास त्याने हळूहळू संपादन केला. सरकारला कळवूनही त्याच्या दुष्कृत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. ही देशाची लूट आहे. अशांचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा आहे, असेही पवार म्हणाले.जर शेतक-यांकडे बँकेची ४-५ हजारांची थकबाकी राहिली तर त्याची भांडी बाहेर काढली जातात, त्याच्या अब्रूचा पंचनामा केला जातो़, हेकसले राज्यकर्ते, असा सवाल करून पवार म्हणाले, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ३२ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत़ शेतकरी आता मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू लागला आहे, ही परिस्थिती चिंताजनक आहे.स्वयंसेवकांना हाफ पॅन्ट घालून लढाईला पाठवा -देशाच्या सैन्याने संरक्षणासाठी मोठी किंमत चुकविली आहे. काश्मीरमध्ये आपल्या हजारो सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. केंद्राने दहशतवाद्यांशी लढण्यासाठी हाफ पँट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना पाठवावे, म्हणजे त्यांना याचे तथ्यही कळेल. आम्हाला याबाबत राजकारण करावयाचे नाही. भागवतांचे वक्तव्य भारतीय सैन्याची अप्रतिष्ठा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा