शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिशा सालियन प्रकरणाचे सर्व पुरावे तयार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; तारीखही सांगितली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 13:39 IST

दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलेला असताना आता त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढचं पाऊल टाकत या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलेला असताना आता त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढचं पाऊल टाकत या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. दिशा सालियन प्रकरणाचा सविस्तर उलगडा होणार असून त्या संबंधित सर्व पुरावे तयार आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच दिशा सालियन प्रकरणाची सर्व माहिती ७ मार्च रोजी सर्वांसमोर येईल असाही दावा पाटील यांनी केला आहे. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा दिशा सालियनच्या हत्येचा उलगडा करणार होता म्हणून त्याची हत्या केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. दिशा सालियन हिनं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली होती असाही दावा राणेंनी केला आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणाबाबत ७ मार्च रोजी सर्व पुरावे बाहेर येणार असल्याचं म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

"७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार असून त्या संबंधिचे सर्व पुरावे तयार आहेत. दरम्यान दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषा वापरणं सुरू आहे", असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. 

आम्हालाही जगू द्या, नाहीतर...राजकारण्यांनी आमचं जगणं आता मुश्कील केलं आहे. आम्हाला जगू द्या. आमच्या मुलीची अशीच बदनामी होत राहिली तर आम्हीही आमच्या जीवाचं काहीतरी बरंवाईट करुन घेऊ आणि त्याला हेच राजकारणी जबाबदार असतील असा इशारा दिशा सालियनच्या मातोश्रींनी दिला आहे. यावेळी राजकारण्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे आम्हीही तणावात आहोत, असं दिशाच्या मातोश्री म्हणाल्या. दिशाच्या मृत्यूचं प्रकरण आता जास्त वाढवू नका असं हात जोडून सर्वांना विनंती करणाऱ्या दिशाच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले होते. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दिशा सालियनच्या मातोश्री आणि वडिलांनी एक लेखी तक्रारपत्र किशोरी पेडणेकर यांच्याकडे दिलं. दिशाची बदनामी होत असल्याची तक्रार सालियन यांच्या मातोश्रींनी महिला आयोगाकडे केली आहे.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलNarayan Raneनारायण राणे Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत