शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

'लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा शिवसेना स्वबळावर लढणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:17 IST

शिवसेना लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मुंबई- 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. अनेकांनी त्या त्या मतदारसंघात पुढच्या वर्षी होणा-या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही आज शिवसेना भवनात एक बैठक घेतली आहे. त्या बैठकीत शिवसेना लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गणेशोत्वापूर्वी शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार निश्चित करण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेनं आतापासूनच चाचपणीला सुरुवात केली आहे.मुंबईत लोकसभेचे 6 सहा मतदारसंघ आहेत. त्यातील काही मतदारसंघ हे भाजपाकडे आहेत. त्यामुळे भाजपाकडून ते मतदारसंघ कशा प्रकारे हिसकावता येतील यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहणार आहे. तसेच शिवसेनेच्या विद्यमान 18 खासदारांना पुन्हा संधी मिळणार आहे. भाजपा नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना रणनीती आखणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईतील खासदार, आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक संपली, त्यानंतर शिवसेना लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकही या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना दिग्गज नेत्यांना भाजपाच्या विरोधात रिंगणात उतरवणार आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे