शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग समुद्र पर्यटक बुडीत दुर्घटना; दुसरा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 09:44 IST

अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे.

ठळक मुद्देअलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे.ऋषभ सिव्हा (24) या तरूणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी ७.३० वाजता सापडला.

- जयंत धुळप

अलिबाग, दि. 17- अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे. ऋषभ सिव्हा (24) या तरूणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. तब्बल २९ तासांनंतर नैसर्गिक भरतीत अलिबाग जवळच्याच नागाव समुद्र किनारी हा मृतदेह सापडला आहे. अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली आहे. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाऱ्याकडे येत असताना दोन जण बुडाल्याची घटना घडली होती. दरम्यान सौरभ खान या पर्यटकाचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० वाजता नैसर्गिक भरतीच्या वेळीच  तुषार शासकीय विश्रामगृहाजवळ अलिबाग समुद्र किनारी सापडला होता. पण त्या तरूणाचं सौरभ खान असं नाव नसून सोहराब खान असं नाव असल्याचं त्याच्या नातेवाईक येथे आल्यावर त्यांच्याकडून समजल्याचे वराडे यांनी सांगीतलं.

आणखी वाचा

सौरभचा मृतदेह सापडला

अवघ्या १५ मिनिटांत दोघांच्या आत्महत्या

सोहराब खान आणि ऋषभ सिव्हा या दोघा तरुण पर्यटकांचे फोटो आम्हाला तपासादरम्यान त्यांच्याच मोबाईलमधून उपलब्ध झाले. मंगळवारी दुपारी २ वाजता कुलाबा किल्ल्यात जाण्यापूर्वी त्यांनी ते अलिबाग समुद्र किनारीच काढले आहेत. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील स्मृती आपल्या जवळ राहाव्या या हेतूने काढलेले हे त्यांचे फोटो, काही तासानंतर होणाऱ्या त्यांच्या मृत्यूअंती पोलिसांना मृतदेहाची आेळख पटवण्यासाठी कामी येतील असे त्यांच्याही आणि पोलिसांच्याही मनात नव्हते. परंतु नियतीला तेच मंजूर होते. मी आणि माझी संपूर्ण टीम मंगळवारी घडलेल्या या दूर्दैवी घटनेपासून अत्यंत विषण्ण मनस्थितीत होतो. नातेवाईकांची मनस्थिती पाहील्यावर आम्हालाही दुःख अनावर झाले. अशी दुर्दैवी परिस्थिती कुणाच्याही वाट्याला येवू नये. ऐन उमेदीतील आपली मुले गमावणे यापेक्षा अतिव दूखः आई-वडिलांना दूसरे कोणतेही असू शकत नाही. तरुणाईने कुणीतरी काहीतरी सांगतय ते आपल्याच भल्याचे आहे, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे, अशी अत्यंत हळवी भावना या साऱ्या प्रसंगांती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी व्यक्त केली आहे.