सौरभचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:32 AM2017-08-17T05:32:35+5:302017-08-17T05:32:37+5:30

समुद्रात असणाºया कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २च्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाºयाकडे येत असताना बुडून बेपत्ता झालेल्या दोघा पर्यटकांपैकी सौरभ खान (२३) याचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० वाजता आढळला.

Saurabh's body was found | सौरभचा मृतदेह सापडला

सौरभचा मृतदेह सापडला

Next

अलिबाग : समुद्रात असणाºया कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २च्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाºयाकडे येत असताना बुडून बेपत्ता झालेल्या दोघा पर्यटकांपैकी सौरभ खान (२३) याचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० वाजता आढळला. नैसर्गिक भरतीच्या वेळी तुषार शासकीय विश्रामगृहाजवळ अलिबाग समुद्रकिनारी पोहोचला.
त्याच्यासोबत बेपत्ता झालेल्या ऋषभ सिव्हा (२४, रा. रसायनी, मूळ रा. गोवा) याच्या शोधासाठी अलिबाग कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या सहकार्याने कुलाबा किल्ला परिसरात शोध मोहीम सुरू असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. मृत सौरभ खान हा मूळचा गुजरातमधील रतलाम येथील राहणारा असून, त्याचे नातेवाईक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्याकरिता येथील जिल्हा रुग्णालयात पोहोचले आहेत. शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
सांगून ऐकले नाही- महेंद्र पवार
रसायनीमधील डेकोर होम कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेले हेबल प्रधान, उरप मिश्रा, सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा हे पाच जण फिरायला आले. यापैकी सुरेश, सौरभ, वृषभ हे कुलाबा किल्ला पाहण्यासाठी ओहोटीच्या वेळी चालतच किल्ल्यात गेले होते, तर अभिराम व उरप हे दोघे किनाºयावरच थांबले होते. दुपारी २ वाजता भरती सुरू झाल्यावर किल्ल्यात गेलेल्या एकूण आठ पर्यटकांनी या भरतीतून किनाºयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी या आठ जणांना भरतीच्या पाण्यातून जाऊ नका, तुम्हाला समुद्राच्या भरतीचा अंदाज येणार नाही, असे या किल्ल्यात कार्यरत पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी महेंद्र पवार यांनी सांगितले.
पाच जण पवार यांची विनंती मान्य करून किल्ल्यातच थांबले; परंतु सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा हे तिघे भरतीच्या पाण्यातून किनाºयाकडे गेले, अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी महेंद्र पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सुरेश स्वामी हा सुदैवाने पोहत किनाºयावर पोहोचल्याने सौरभ खान व वृषभ सिव्हा बुडाल्याची माहिती समजली. दरम्यान, या पाच जणांना लाइफ गार्डच्या बोटीने किनाºयावर सुखरूप नेण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.
>जुम्मापट्टी येथील धबधब्यावर तरु णाचा मृत्यू
नेरळ-माथेरान घाट रस्त्यावरील जुम्मापट्टी येथील धबधब्यावर दगडावरून पाय घसरून उल्हासनगर येथील तरु णाचा मृत्यू झाला.
उल्हासनगर येथील चार तरु णांचा गट १५ आॅगस्टला सकाळी जुम्मापट्टी धबधब्यात आला होता. अर्धा तास मजा के ल्यानंतर भीमान रोहरा हा तरु ण धबधब्यावर चढू लागला. तेथे मका कणीस विकणारे दिनकर दरवडा यांनी शेवाळावरून पाय घसरतो, असे सांगून अडविण्याचा प्रयत्न केला. तरी भीमान वर चढत होता. धबधब्याच्या तिसºया टप्प्यावर असताना तो दगडावरून पाय घसरून खाली आदळला. खाली दगड असल्याने डोक्यातून रक्तस्राव होऊन भीमानचा जागीच मृत्यू झाला.
नेरळ पोलिसांना ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सोमनाथ जाधव हे सहकाºयांसह तेथे पोहचले. भीमानचा मृतदेह कर्जत येथील
उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

Web Title: Saurabh's body was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.