शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

अलंकापुरी भक्तिरसात चिंब..!

By admin | Updated: June 18, 2017 00:25 IST

श्रीविठ्ठल भेटीच्या ओढीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८७व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याने शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजता श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवले.

भानुदास पऱ्हाड । लोकमत न्यूज नेटवर्कआळंदी : ‘‘अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक!!जाईन गे माये तया पंढरपुरा!भेटेन माहेर आपुलिया!!’’श्रीविठ्ठल भेटीच्या ओढीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८७व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याने शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजता श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवले. देहभान विसरून ‘ज्ञानोबा-माउली-तुकारामां’चा जयघोष करीत लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले. पंढरीकडे जाण्यासाठी लाखो महिला-पुरुष वारकरी दाखल झाल्याने ज्ञानियांच्या अलंकापुरीला भक्तिसागर लोटला होता. प्रस्थान सोहळ्यास पहाटे ४ला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दूधआरती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी १२ला ‘श्रीं’ना महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याच्या तयारी सुरू झाली. प्रथम मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. त्यानंतर माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा पालखी सोहळा यांच्यातर्फे ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आले. ग्रामस्थ, मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले.तत्पूर्वी, वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या निनादात ‘ज्ञानोबा-तुकारामां’चा जयघोष करत फेर, फुगड्यांनी मंदिर परिसर दुमदुमून सोडला होता. वारकऱ्यांच्या उत्साहाला आनंदाची भरती आली होती. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, तुळशीवृंदावन डोईवर घेऊन विठूनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या महिला आणि तरुण वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. हा वैभवी सोहळा मंडप इमारतीत मुक्कामासाठी विसावला.टाळ-मृदुंगाचा निनाद अन् ‘ज्ञानोबा तुकोबां’चा जयघोष आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्य महाद्वारातून मानाच्या ४७ दिंड्याना मंदिरात प्रवेश दिल्यानंतर टाळ-मृदुंगाचा निनाद व ‘ज्ञानोबा तुकोबां’चा जयघोष अंगावर शहारे उमटवीत होता. फेर, फुगडी, मनोऱ्यामधून मनसोक्त बेभान होऊन वारकरी नाचत होते. माउलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षकमाउलींच्या १८७व्या पायीवारी प्रस्थानप्रसंगी पवमान अभिषेक, वेदघोष, समाधीवर माउलींच्या मुखवट्याला दूध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माउलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधीवत पूजासमयी माउलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसत होते.दृष्टिक्षेपात- घंटानादाने पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ. - वैष्णवांचा अलोट भक्तिसागर.- पोलिसांचा चोख बंदोबस्त. - इंद्रायणी काठावर रंगला भक्तांचा आनंदमेळा.