शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

अकोला मेडिकल कॉलेज देशात सहावे!

By admin | Updated: May 26, 2017 03:16 IST

इंडिया टुडेचा सर्व्हे: सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महाविद्यालय उपक्रमांतर्गत गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इंडिया टुडे या प्रतिष्ठित इंग्रजी साप्ताहिकाने सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महाविद्यालय उपक्रमांतर्गत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचा सर्व्हे केला होता. या सर्व्हेचा निकाल इंडिया टुडेने प्रसिद्ध केला असून, यात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा बहुमान मिळवून देशातून सहावा क्रमांक पटकावला आहे. यामुळे अकोलेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. इंडिया टुडे या प्रतिष्ठित इंग्रजी साप्ताहिकामार्फत दरवर्षी सर्व्हे केला जातो. यावर्षी इंडिया टुडेने देशभरातील नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्वेक्षण केले. देशभरातील शेकडो वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून देशभरातून दहा वैद्यकीय महाविद्यालयांची सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात देशातून सहावा क्रमांक पटकावून सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा बहुमान मिळविला. अकोलेकरांच्या आंदोलनात्मक पवित्र्याने आणि अथक परिश्रमानंतर अकोल्यात २००३ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. सर्वोपचार रुग्णालयसुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडण्यात आले. सुरुवातीला एमबीबीएस १०० जागा देण्यात आल्या होत्या. नंतर त्यात आणखी ५० जागांची भर पडली. वैद्यकीय महाविद्यालयात सध्या ७०० विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमाला शिकत आहेत. यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दहा विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण सुरू झाले असून, एमबीबीएससोबतच अनेक विद्यार्थी एमडी होऊन येथून बाहेर पडतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसला शिकणारे विद्यार्थी केवळ शिक्षणच घेत नाही, तर संशोधनामध्येसुद्धा अग्रेसर आहेत. दोन वर्षांपासून आयसीएमआरकडून सातत्याने दोन वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड होत आहे. निकालसुद्धा दरवर्षी ९५ टक्क्यांच्यावर लागतो. यावर्षी आयसीएमआरने पोषक आहार घेणाऱ्या मातांच्या दुधावर संशोधन करण्यासाठी १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच इंडिया टुडेने देशातील सहाव्या क्रमांकाचे बेस्ट कॉलेज म्हणून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आपल्या यादीत स्थान दिले आहे. ही बाब अकोलेकरांसाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील एकमेव कॉलेजइंडिया टुडेच्या सर्वेक्षणात देशाभरातून सहाव्या क्रमांकाचे बेस्ट कॉलेज म्हणून निवड केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रातून एकमेव आहे. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाला इंडिया टुडेच्या यादीत स्थान मिळू शकले नाही. या यादीमध्ये अकोला वैद्यकीय महाविद्यालयासोबतच पाँडेचेरी, लखनौ, देहरादून, रांची, भोपाळ, नेल्लोर, इंदूेर, मँगलोर येथील वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. इंडिया टुडे या प्रतिष्ठित इंग्रजी साप्ताहिकाने केलेल्या सर्वेक्षणात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने देशातून बेस्ट कॉलेज म्हणून सहावा क्रमांक पटकावला. ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे संशोधन येथील शिक्षण दर्जेदार आहे. यावर या सर्वेक्षणातून शिक्कामोर्तब झाले आहे. हा दर्जा टिकून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डॉ. कुसुमाकर घोरपडे, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.