शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

अकोल्याचा बोलबाला! विज्ञान : प्राची नालिंदे मुलींमध्ये विभागातून अव्वल विज्ञान : वैभव भगत मुलांमध्ये विभागातून अव्वल वाणिज्य : क्षितीज गोयनका

By admin | Updated: June 3, 2014 01:50 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अकोल्याची प्राची अनिल नालिंदे ही ९६.६१ टक्के गूण घेऊन विज्ञान शाखेमध्ये अमरावती विभागात अव्वल ठरली आहे. वैभव भगत (विज्ञान) हा ९६.४६ टक्के गूण घेऊन विभागातून द्वितीय तर मुलांमधून अव्वल ठरला आहे. अकोल्याचाच क्षितीज गोयनका हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ९५.६९ टक्के गूण घेऊन विदर्भात अव्वल ठरला आहे.

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अकोल्याची प्राची अनिल नालिंदे ही ९६.६१ टक्के गूण घेऊन विज्ञान शाखेमध्ये अमरावती विभागात अव्वल ठरली आहे. वैभव भगत (विज्ञान) हा ९६.४६ टक्के गूण घेऊन विभागातून द्वितीय तर मुलांमधून अव्वल ठरला आहे. अकोल्याचाच क्षितीज गोयनका हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ९५.६९ टक्के गूण घेऊन विदर्भात अव्वल ठरला आहे.अमरावती विभागाच्या निकालात अकोला जिल्‘ाने आघाडी घेतली आहे. अकोला जिल्‘ाचा निकाल ९३.३६ टक्के लागला असून, बुलडाणा जिल्‘ाचा ९२.७१ टक्के तर वाशिम जिल्‘ाचा निकाल ९२.५२ टक्के लागला आहे.बारावीच्या निकालात अकोल्याच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. निकालामध्ये यावर्षीही मुलींचाच बोलबाला दिसून आला. अकोला जिल्‘ात उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ९५.७४ तर मुलांची टक्केवारी ९१.२३ इतकी आहे. अकोल्यातील ज्योती जानोळकर कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थीनी प्राची अनिल नालिंदे ही विभागातून अव्वल ठरली. तिला ९६.६१ टक्के गूण मिळाले आहेत. जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी वैभव भगत हा ९६.४६ टक्के गूण घेऊन विभागात मुलांमधून अव्वल ठरला. बुलडाणा जिल्‘ात ९५.0७ टक्के मुली तर ९0.९४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. बुलडाणा जिल्‘ाने यावर्षी अमरावती विभागात द्वितीय क्रमांक पटकावून आपला लौकीक कायम ठेवला आहे. बुलडाणा जिल्‘ातील २३ हजार ८१८ विद्यार्थी परिक्षेसाठी नोंदविले गेले होते. प्रत्यक्षात २३ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यामध्ये २२ हजार ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा निकाल ९२.७१ टक्के एवढा लागला आहे. जिल्‘ातील पुनर्परिक्षार्थींची संख्या २ हजार ९६ एवढी होती. प्रत्यक्षात २ हजार २१ एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली, त्यापैकी ७६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ३७.९० आहे. जिल्‘ातील सर्व १३ तालुक्यांमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. जिल्‘ातील २७ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.वाशिम जिल्‘ात ९४.२६ टक्के मुली तर ९१.३१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. वाशिम जिल्‘ाचा निकाल ९२.५२ टक्के लागला आहे. गतवर्षी वाशिम जिल्हा ८५.२५ टक्के निकालासह विभागातून प्रथम स्थानावर होता. यंदा वाशिम जिल्हा विभागात तिसरा असला तरी निकालाची टक्केवारी वाढली आहे. वाशिम जिल्‘ातून परीक्षेसाठी ११,७७१ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. प्रत्यक्षात ११,७६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १०,८८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्‘ात मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.३१ टक्के तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४ टक्के एवढी आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्‘ातील १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.