शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Ketaki Chitale : “कोणाच्याही आजारावर उपहासात्मक लिहिणं ही विकृतीच,” केतकी चितळेच्या पोस्टवर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 13:38 IST

अभिनेत्री केतकी चितळे हीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हीनं आपल्या फेसबुक (Facebook) अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक स्तरांतून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडूनही यावर आक्षेप घेण्यात आला असून कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासात्मक लिहिणं ही एक विकृतीच आहे, अशी स्पष्ट भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे (Anand Dave) यांनी घेतली आहे.

“आमचं राष्ट्रवादी काँग्रेससोबतचं वैचारिक शत्रूत्व कायम आहे आणि भविष्यातही आम्ही तितक्याच ताकदीनं लढत राहू. परंतु कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासात्मक लिहिणं, त्यांच्या मरणाची वाट पाहणं ही विकृतीच आहे,” अशी भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे. या आजाराला शिक्षा ही झालीच पाहिजे, असं म्हणत त्यांनी यावर आक्षेप घेतला. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केतकी चितळेनंशरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर ब्राह्मण महासंघानंही आक्षेपन नोंदवला आहे.

काय आहे प्रकरण?केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबाबत आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीनं शरद पवार यांच्या आजारावरून टीका केली होती. तिनं आपल्या फेसबुकवर शेअर केलेल्या कवितेच्या खाली तिनं अॅडव्होकेट नितीन भावे असं नावंही दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसंच अनेकांनी तिच्या या पोस्टवर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, यावरून यानंतर तिच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेSharad Pawarशरद पवारbrahman mahasanghब्राह्मण महासंघ