शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्यवाहांनी दिला पदाधिकाऱ्यांनाच घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 17:07 IST

काही पदाधिकाऱ्यांच्या मनमानी काराभाराविरोधात केली धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

ठळक मुद्देमनमानी कारभाराविरोधात संस्थेच्या हितासाठी  धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या अनागोंदी आणि मनमानी आर्थिक कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी परिषदेचे सहकार्यवाह यांनी धर्मादाय आयुक्तांकडे करून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाच घरचा आहेर दिला आहे. या तक्रारीनुसार सर्व पदाधिकारी आणि कार्यकारी समिती सदस्यांना नोटीस पाठविण्यात आली असून, येत्या १४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.          अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ (प्रसाद) कांबळी आणि काही पदाधिकारी हे संस्थेच्या कोणत्याही विश्वस्त व नियामक मंडळाच्या सदस्यांना विश्वासात न घेता तसेच घटनेप्रमाणे कोणतीही सभा न घेता व कोणतीही पूर्वसूचना आणि संमती न घेता संस्थेचे निर्णय परस्पर घेत आहेत. या सर्व गोष्टी संस्थेच्या हिताच्या बाधक आणि हानीकारक आहेत म्हणून परिषदेचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी २५ सप्टेंबर रोजी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. नाट्य परिषदेच्या नवीन घटनेनुसार विश्वस्त मंडळ ९ जणांचे आहे. या मंडळाचे निमंत्रक प्रमुख कार्यवाह आहेत. परंतु निमंत्रक आणि अध्यक्षांनी एप्रिल २०१८ पासून विश्वस्त मंडळाच्या ४ रिक्त जागा जाणीवपूर्वक भरल्या नाहीत. तसेच नाट्यकर्मींना मदत करण्यासाठी अध्यक्षांनी जाहीर केलेल्या १ कोटी २० लाख रुपयांचा निधी वाटप करताना विश्वस्त मंडळ, नियामक मंडळ, कार्यकारी समिती सभेची मंजुरी घेणे आवश्यक होते. पण सभेची कोणतीही मंजुरी न घेता रक्कमांचे वाटप केले. यासाठीचे निकष, गरजू व्यक्तींची नावे व देण्यात येणाऱ्या रकमा संबंधित पदाधिकाऱयांनी स्वतःच ठरविल्या. कोरोना परिस्थितीत ऑनलाइन सभा किंवा घटनेप्रमाणे तातडीची/ परिपत्रक सभा घेण्याची तरतूद असतानाही सभा घेतली गेली नाही. अशा पध्द्तीने शंभर वर्षांची परंपरा असलेल्या नाट्य परिषदेचा कारभार हा मनमानी पद्धतीने सुरू आहे. या कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. .......दोन वर्षे परिषदेचे कामकाज एकाधिकारशाहीने चालले आहे. याबाबत सभेकडे वारंवार तक्रार ही केली आहे.लगेच न्यायालयात जाणे मला संयुक्तिक वाटले नाही. पण लॉकडाऊन काळात कुणालाही विश्वासात न घेता निधीचे वाटप करण्यात आले. परिषदेच्या राखीव निधीवर बँकेत कर्जही काढण्यात आले आहे. पण आम्हाला याचा पत्ता नाही. या सर्व मनमानी कारभाराविरोधात संस्थेच्या हितासाठी  धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करावी लागली- सतीश लोटके, सहकार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटक