शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अजितदादा,एकतर आम्हाला बोलवा किंवा मग तुम्ही तरी आमच्याकडे चहाला या! फडणवीसांची 'ऑफर'  

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 1, 2021 19:05 IST

पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्सुकता नव्हती तितकी मीडियामध्ये होती..

 पुणे : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित राहणार असतील तर हल्ली त्या कार्यक्रमाच्या आधी २ दिवस व नंतरचे दोन दिवस माध्यमांमध्ये बातम्यांची चढाओढ सुरु असते. पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्सुकता नव्हती तितकी मीडियामध्ये होती. त्यामुळे गेले दोन दिवस अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकत्र येणार या विषयीच्या बातम्याच बातम्या पाहायला मिळाल्या. पण जरी मी आणि दादा एकत्र येणार होतो तरी आम्ही काय कुस्ती वगैरे खेळणार होतो की एखादे गाणे म्हणणार होतो , मला काही कळत नाही. त्यामुळेच आता अजितदादा, एकतर तुम्ही तरी आमच्याकडे चहाला या किंवा मला तरी तुमच्याकडे बोलवा म्हणजे मीडियाला बातम्याच बातम्या मिळून जातील, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात चहाची 'खास' ऑफर दिली.

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी फडणवीसांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. हा सोहळा महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ , खासदार डॉ. अमोल कोल्हे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार , जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह शहरातील आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, पुणे व पिंपरी शहराची वाढ झपाट्याने होत आहे. त्यात महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराच्या गरजा देखील वाढणार आहेत. मेट्रो, पिण्याचे पाणी, वाहतूक, उदयॊग धंदे, आरोग्य यांचा समावेश आहे. परंतू, पुण्याचे प्रश्न मार्गी लावताना आता चिंता करायची गरज नाही. कारण राज्याची तिजोरीच पुण्याकडे आहे. तसेच भामा आसखेड प्रकल्पाची पुणेकरांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अनोखी भेट मिळाली आहे. मात्र या प्रकल्पासाठी खासदार गिरीश बापट यांनी वेळोवेळी बैठका घेतला व पालिकेकडूनही चांगली योजना निर्माण झाली आहे. परंतू, यापुढे पुण्याचे प्रश्न मार्गी लावताना आता चिंता करायची गरज नाही. कारण राज्याची तिजोरीच पुण्याकडे आहे. 

पुण्यात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले... पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकत्यांमध्ये जबरदस्त उत्साहाचे वातावरण होते. या आगामी काळातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात हे दोन दिग्गज नेते एकत्र येत असल्याने राजकीय फटकेबाजी अनुभवायला मिळण्याची शक्यता होती. पण या कार्यक्रमादरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भिडल्याने कार्यक्रमात पुरता गोंधळ उडाला. 

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका