नंदुरबार : शहादा येथे मुक्कामी दौऱ्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला. त्यांच्या हस्ते होणारे उद्घाटन रद्द करण्यात आले.पवार यांनी केवळ कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळातर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत पहिले क्रीडा प्रशिक्षण सुविधा केंद्र बांधण्यात आले आहे. त्याचे रविवारी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे पवार यांनी उद्घाटनाची फित कापणे टाळले. भाषणातही त्यांनी राजकीय वक्तव्य टाळून पी. के. अण्णांच्या कार्याचा गौरव केला. (प्रतिनिधी)
अजित पवारांच्या दौऱ्याला आचारसंहितेचा फटका
By admin | Updated: March 29, 2016 01:15 IST