मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघाताबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातात अजित पवारांचे दुर्दैवी निधन झाले. मात्र त्यानंतर सोशल मीडियासह सगळीकडे अपघातावर विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र पाठवून या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर केंद्रानेही तात्काळ पाऊल उचलत देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून उत्तर देण्यात आले आहे.
फडणवीसांच्या पत्राला उत्तर म्हणून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी पत्र पाठवले आहे. या पत्रात नायडू म्हणतात की, बारामतीजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताबाबत आपल्या दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजीचं पत्र मला मिळाले. या दुर्दैवी घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मी माझ्या मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो. भारत सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. निर्धारित कार्यपद्धतीनुसार विमान अपघात तपासणी ब्युरो (AAIB) यांनी AAIB नियमांतील संबंधित तरतुदींनुसार औपचारिक तपास सुरू केला आहे. AAIB आणि DGCA यांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून ‘ब्लॅक बॉक्स’ सुरक्षितरित्या जप्त करून सखोल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे असं त्यांनी माहिती दिली.
तसेच हा तपास पारदर्शक, सखोल आणि वेळेत पूर्ण होईल अशा पद्धतीने Aircraft (Investigation of Accidents & Incidents) Rules, 2025 या ठरवून दिलेल्या SOPs आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार केला जात आहे. सर्व संबंधित पुरावे, तांत्रिक नोंदी, कार्यपद्धतीविषयक तपशील आणि घटनास्थळावरील निरीक्षणे तपासून घटनाक्रम स्पष्ट केला जाईल व कारणीभूत घटक निश्चित केले जातील असं आश्वासन केंद्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
दरम्यान, पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली आहे. तपासाच्या प्राथमिक निष्कर्षांनंतर आणि अंतिम अहवालातील सुरक्षितता शिफारशी व नियामक/कार्यक्षम उपाययोजना AAIB, DGCA आणि इतर संबंधित संस्थांच्या समन्वयाने राबविण्यात येतील. या तपासासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरेल. विशेषतः घटनास्थळी स्थानिक प्रशासकीय मदत आणि विविध यंत्रणांमधील समन्वयासाठी ते गरजेचे आहे. तपासातून निष्पन्न होणारे महत्त्वाचे निष्कर्ष योग्य वेळी राज्य शासनास कळविण्यात येतील असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी सांगितले आहे.
Web Summary : Following Ajit Pawar's plane crash, Fadnavis requested a probe. The Aviation Ministry initiated an investigation, secured the black box, and pledged transparency. Findings will be shared.
Web Summary : अजित पवार के विमान दुर्घटना के बाद, फडणवीस ने जांच का अनुरोध किया। विमानन मंत्रालय ने जांच शुरू की, ब्लैक बॉक्स सुरक्षित किया, और पारदर्शिता का वादा किया। निष्कर्ष साझा किए जाएंगे।