शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

बाजार समितीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसोबत झळकला अजित पवारांचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 22:26 IST

धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील गटबाजी पाहायला मिळत आहे.

जळगाव - गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. माध्यमांमध्ये सातत्याने अजित पवारांबद्दल बातम्या येत असताना बुधवारी अजित पवारांनी याचा खुलासा करत जीवात जीव असेपर्यंत पक्षात राहणार, राजकीय चर्चा तथ्यहिन आहेत असं म्हटलं. त्यानंतर अजित पवारांच्या बातम्यांना तुर्तास पूर्णविराम मिळाला. परंतु जळगावात बाजार समितीच्या निमित्ताने लागलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

जळगावातील धरणगाव बाजार समिती निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीचा एक गट मैदानात उतरला आहे. त्यामुळे प्रचार पत्रकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी शिवसेना-भाजपासोबत युती करत बाजार समितीत उमेदवार उभे केले आहेत. याआधीही दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवारांनी शिवसेना-भाजपाला साथ दिली होती. 

धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील गटबाजी पाहायला मिळत आहे. अर्धी राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केले. शेतकरी टिकेल तर शेत पिकेल असं म्हणत शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी सहकार पॅनेल या निवडणुकीत उभे करण्यात आले आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटो एकत्रित पाहायला मिळत आहे. 

राज्यात अजितदादांचीच चर्चाविरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार या वृत्ताने तीन दिवस राजकीय वर्तुळ ढवळून निघाले होते. त्यावर स्वतः दादांनीच जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असे स्पष्ट केल्याने तूर्त पडदा पडला. आपल्याबाबतच्या बातम्या पेरल्या गेल्या अशी अजितदादांची तक्रार आहे. प्रसारमाध्यमांनी आता हे प्रकरण संपवावे असे आर्जवही त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे झालेल्या शपथविधीनंतर अजितदादांबाबत शंकेचे वातावरण कायमच राहिले आहे. त्यामुळे त्याबाबत छोटेसेही काही घडले की लगेच त्याच्या मोठ्या बातम्या होतात. त्यातच अचानक नॉट रिचेबल होत अजितदादाच मग गॉसिपिंगला वाव देतात. काही दिवस सुरू असलेल्या चर्चेच्या मुळाशी अजित पवार यांच्यावर रोख असलेले संजय राऊत यांचे मुखपत्रातील ठोक वाक्य कारणीभूत ठरले. भाजपसोबत जाण्यासाठी आपल्या कुटुंबातील काही जणांवर दबाव असल्याचे उद्धव ठाकरेंबरोबरच्या भेटीत शरद पवार यांनीच सांगितल्याचा दावा त्यावेळी तिथे हजर असलेले राऊत यांनी केला अन् अजितदादा हे भाजपचे बोट धरणार असल्याच्या बातमीला बळ मिळाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे