शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

‘कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे नाही हे विधान परिषद निवडणुकीत कळेल’, अजितदादांचं फडणवीसांना थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:04 IST

Maharashtra Vidhan Parishad Election : राज्यसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्याचं कौतुक झालं होतं. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे.

मुंबई - राज्यसभा निवडणुकीतील सहावी जागा भाजपाने शिताफीने जिंकल्याने राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. त्यामुळे अगदी चार-पाच दिवसांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत या अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्याचं कौतुक झालं होतं. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे. कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे नाही हे विधान परिषद निवडणुकीत कळेल, असा थेट इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.

विधान परिषद निवडणुकीतील रणनीतीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल काठावर लागला आहे. पण अनुभवातून माणूस शिकतो. एखादी निवडणूक लढत असताना ज्यांच्या बाजूने निकाल लागतो त्यांच्याबाजूने कौशल्य असं म्हटलं जातं,  तर जे पराभूत झाले ते कमी पडले असं म्हणतात. राज्यसभा निवडणुकीनंतरही तसंच समजलं गेलं. मात्र आता आता या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे कौशल्य नाही हे जनतेला कळेल, अशा शब्दात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या राज्यात असलेल्या समिकरणांनुसार दहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भाजपाचे चार, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदान निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरस आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा अपक्ष आणि इतरांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, अशा परिस्थितीत एक एक मत निर्णायक ठरेल. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस