शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

...अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाही; शिवसेना आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 15:07 IST

शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीच्य सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदा अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना निधी वाटप केला आहे असं शिरसाट म्हणाले.

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते. त्यात राजकीय चर्चा नाही.  मुख्यमंत्रिपद जाणार ही विरोधकांची अफवा आहे. मग कुठे अजित पवारांचे बॅनर लावायचे. तर कुठे माध्यमांना विधाने करायची.  पण २०२४ पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहतील. मंत्री अनिल पाटील अथवा राष्ट्रवादी प्रवक्ते जे काही विधाने करतायेत त्यामुळे अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाहीत. अजित पवारांच्या अडचणीत वाढ होईल हे नक्की असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आमची बाजू मजबूत आहे. ज्यांची बाजू कमकुवत त्यांच्या मनात भीती असते. आम्ही वकिलांमार्फत सर्वकाही विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे आम्हाला भीती नाही. विधानसभा अध्यक्ष जो काही निर्णय घेतील हा त्यांचा अधिकार आहे. परंतु आमची बाजू भक्कम आहे. ती आम्ही कोर्टातही सिद्ध केली आहे असं त्यांनी सांगितले.

अजित पवारांना नाहक बदनाम केलं जातंय

शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीच्य सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदा अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना निधी वाटप केला आहे. अनेकांनी यावरे मते मांडली आहे. काहींना वाटते आमच्यावर अन्याय झाला असेल, काहींना वाटते भाजपावर अन्याय झाला असेल पण सर्वांनाच सारखा निधी वाटलेला आहे हे मी आर्वजून सांगतो. अजित पवारांना नाहक बदनाम केले जातेय. आमच्यावरही टीका केली जाते. ज्यांना निधी किती दिला याची माहिती नाही तेसुद्धा टीका करू लागलेत. अजित पवार यांनी निधीवाटपात मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनी ठरवलेल्या सूत्रानुसार निधी दिला आहे. सत्तेत असल्याने जो सत्तेत असतो त्यांना जास्त निधी दिला जातो. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही हेच घडले आहे. अजित पवारांनी निधी वाटप केले त्यात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीच्या सगळ्याच आमदारांना समान निधी दिलेला आहे. त्यामुळे निधी वाटपात कुठलीही नाराजी नाही असं प्रत्युत्तर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांना दिले आहे.

रोहित पवारांचे आंदोलन नौटंकी

अडीच वर्ष सरकार होते तेव्हा एमआयडीसीवर बोलता येत नाही का? विधानसभा अधिवेशन सुरू असताना अशाप्रकारे आंदोलन करणे ही नाटके आहेत. सरकारमध्ये काम करताना आमदाराने पाठपुरावा करणे गरजेचे असते. पाठपुरावा कमी पडला तर आपल्या मनात जी इच्छा असते ती पूर्ण होत नाही असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी आमदार रोहित पवारांना लगावला आहे.

टोलनाके फोडणे योग्य नाही

टोलनाक्यावर थांबवले असेल तर तुमची ओळख दाखवा. आम्ही देखील आमदार आहोत. टोलनाके फोडणे उचित नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही. सरकार आपल्यापद्धतीने कारवाई करेल अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाके फोडले त्यावर दिली आहे.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदे