शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

'अजित पवार म्हणाले, उलट-सुलट काहीच होणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 10:14 IST

अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भेट देत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

-मोसीन शेख 

मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून सत्तास्थापनेचा दावा करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याने काल मोठा राजकीय भूकंप अनुभवला होता. यावरून कालचे वातावरण ढवळून निघाले होते. आज सकाळी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या चर्च गेट येथील निवास्थानी भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, उलट-सुलट काहीच होणार नाही.

अजित पवार हे काल मध्यरात्री आपले बंधू श्रीनिवास पाटील यांच्या घरातून निघून आपल्या चर्च गेट परिसरातील निवास्थानी दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. तर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भेट देत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांची भेट घेऊन आलेले औरंगाबादमधील पैठण येथील राष्ट्रवादीचे नेते अप्पासाहेब निर्मल पाटील यांनी ही माहिती लोकमतला दिली आहे.

पाटील म्हणाले की, आज सकाळीच आम्ही अजित पवारांची भेट घेतली असून जवळपास 15 मिनटांपेक्षा अधिक वेळ त्यांच्यासोबत गप्पा झाल्या. अजित पवार यांच्याबरोबर बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर चिंता असल्याचे जाणवले नाही. त्यांनी आमच्या सोबत मनमोकळ्यापणाने चर्चा केली. तसेच बाहेर उलट-सुलट चर्चा सुरु असल्याचे त्यांना विचारले असता, उलट-सुलट काहीच होणार नसल्याचे पवार म्हणाले असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

त्याचबरोबर अजित पवारांनी पहिल्यांदाच एवढावेळ आम्हाला दिला. तर यावेळी त्यांनी पैठण मतदारसंघातील परिस्थितीची माहिती विचारली असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले आहे. तसेच अजित पवारांचा निर्णय आम्हाला मान्य असणार असून ते योग्यच निर्णय घेतील असेही पाटील म्हणाले.