शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अजित पवारांचा विरोध, पण...; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:20 IST

एकीकडे योगींच्या "बटेंगे तो कटेंगे" या घोषणेचा विरोध केला असून दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक है, तो सेफ है" घोषणेचे समर्थन केले आहे...!

राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगात आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रकारच्या घोषणाही दिल्या जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं, तो सेफ हैं' या घोषणांची राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एकीकडे योगींच्या "बटेंगे तो कटेंगे" या घोषणेचा विरोध केला असून दुसरीकडे मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक है, तो सेफ है" घोषणेचे समर्थन केले आहे. 

अजित पवार म्हणाले, "देश एक राहिला तर सेफ राहील, यात काय खराबी आहे. काहीच नाही. आपण सर्वजण एक राहिलो तरच सेफ राहू. यात काय खराबी आहे. यात काय अडचण आहे. मला तर यात काही चुकीचे वाटत नाही. 'सबका साथ सबका विकास', सर्वांचा... सर्वांचा... सर्वांचा विकास. तसेच आपण सर्वजण एक राहिलो तर सेफ राहू." यावर 'बटेंगे तो कटेंगे'? असे विचरले असता, पवार म्हणाले, "हे चुकीचे आहे, काय 'बटेंगा कटेंगा', असे शब्द महाराष्ट्रात वापरण्यात काही अर्थ नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्रातील लोकांचा विचार वेगळा आहे. कदाचित, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश येथील लोकांचा विचार वेगळा असू शकतो. तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात असे चालत नाही."

"आमच्या महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले आंबेडक यांची विचारधारा, शिव म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा चालते. ही विचारधारा कुणी सोडली तर महाराष्ट्र त्याला स्वीकार करणार नाही," असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, भाजप नेते योगी आदित्यनाथ आपल्या रॅलींमध्ये 'बाटेंगे तो कटेंगे'चा नारा देत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं, तो सेफ हैं’, असा एकतेचा संदेश देत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच, जाती-जातीत भांडण लावणे हा काँग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. SC, ST आणि OBC समाजाची प्रगती व्हावी आणि त्यांना योग्य सन्मान मिळावा, असे त्यांना वाटत नाही. लक्षात असू द्या, 'एक है, तो सेफ है' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी