शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन; शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं रोखठोक प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 20:13 IST

अजित पवारांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

Supriya Sule Vs Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वयावरून टीका केली होती. काही लोक ८४ वर्ष झाले तरी अजून थांबत नाहीत, असं ते म्हणाले होते. अजित पवारांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. "अजितदादा ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन आहेत," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच भारतीय संविधानानुसार त्यांनी राजकारणातून कधी निवृत्त व्हायचे? हा त्यांचा अधिकार आहे, असा टोलाही सुळे यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात शहरातील विविध प्रश्नांबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व आदरणीय पवार साहेबांची पॉलिसी ही कधीच एका व्यक्तीवर बोलण्यासाठी राहिलेली नाही. अरेला कारे म्हणणे सोपे असते. त्याला ताकद लागत नाही, पण शांत बसून सहन करण्यासाठी जास्त ताकद लागते. आज महाराष्ट्र दिल्लीच्या आदेशाने चालत आहे; राज्याला नेतृत्व नाही," असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला आहे. पुण्यातील प्रश्नांवरून सरकारवर टीका

सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे की, "राज्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास थांबला आहे; सर्वसामान्य मायबाप जनतेने आपले प्रश्न मांडायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज, पाणी व रस्ता यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी पुण्यातील लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. पोलीस यंत्रणा व पुणे मनपाचे ट्रॅफिक वॉर्डन्स यांच्या सुसंवाद नसल्याने पुण्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या निर्माण झाली आहे; ती सुरळीत करण्यासाठी पालिकेला सूचना केल्या आहेत. पुण्यात जानेवारी महिन्यातच पिण्याचे पाणी, गुरांचे पाणी व शेतीच्या पाण्याची कमतरता जाणवत असून त्यासाठी आवर्तन येणे गरजेचे आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात पुण्याला २४ × ७ पाणी देण्याचे आश्वासन होते पण तसे होताना दिसत नाही; सरकारला विनंती आहे की हा प्रश्न लाईटली घेऊ नका. कांदा व दुधाला भाव नाही आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते; ही गरिबांची चेष्टा आहे. 'जलजीवन मिशन' हा प्रोग्रॅम चांगला आहे पण त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाही त्यात कमतरता जाणवते. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर बोलायचे नाही व चर्चा करायची नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. भ्रष्ट जुमला पार्टी पुणेकरांना फसवून सत्तेत आली आहे; त्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत. पुण्याचा विकास आराखडा गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे; तो लवकर पूर्ण झाला पाहिजे," अशी मागणी सुळेंनी केली आहे.

दरम्यान, "निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे; आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्षाचे ३६५ दिवस आणि २४ तास निवडणुकांसाठी तयार असतो; अदृश्य शक्तीची आम्हाला भीती वाटत नाही," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार