शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजीनामा देण्यापूर्वीच भाजपच्या गुजराती निरमा पॉवडरने अजित पवार 'क्लिन' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 16:33 IST

खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ अद्याप थांबलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. आता त्याच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. किंबहुना भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले आहे. मात्र अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा उद्देश साध्य झाल्याचे दिसून येत आहे. 

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने भाजपला पाठिंबा दर्शवित उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले होते. मात्र बहुमत सिद्ध झाले नव्हते. राज्यपालांनी फडणवीसांना 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून भाजपला बहुमत सिद्ध कऱण्यास मदत करणार अशी शक्यता होती. मात्र शरद पवारांनी घेतलेल्या भुमिकेमुळे भाजपच्या महत्त्वकांक्षेवर पाणी फेरले गेले. 

दरम्यान अजित पवार गटनेते म्हणून काही आमदार घेऊन भाजपसोबत  गेले होते. मात्र ते आमदार पवारांच्या भूमिकेनंतर परत आले होते. तरी देखील भाजपला सरकार स्थापन्याचा विश्वास होता. त्यातच अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे असलेले आरोप आणि त्याची सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, भाजपच्या आरोपांमुळेच अजित पवार यांची चौकशी सुरू होती. ते अजित पवार भाजपमध्ये जाताच चौकशी बंद झाली होती. 

चौकशी थांबल्याने अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र भाजपमध्ये जाताच क्लिनचीट मिळते, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. याआधी खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.