शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

अजित पवारांसह ६० जणांच्या चौकशीला स्थगिती; उच्च न्यायालयाने दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:26 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य ६० जणांच्या सुरू असलेल्या चौकशीला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य ६० जणांच्या सुरू असलेल्या चौकशीला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. त्यामुळे अजित पवार यांच्यासह अन्य संचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहा हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली. यामध्ये राष्टÑवादीचे अजित पवार व अन्य ६० जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी सरकारने २०१५ मध्ये विशेष अधिकाºयाची नियुक्ती केली. मात्र, महाराष्ट्र सहकार कायद्याच्या कलम ८८ नुसार, ही चौकशी दोन वर्षांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र अजित पवार व इतरांची चौकशी दोन वर्षांत पूर्ण होऊ शकली नाही. चौकशीचा कालावधी वाढविण्यासाठी सरकारने २०१७ मध्ये कायद्यात सुधारणा केली. मात्र ही कायद्यातील सुधारित तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकत नाही, असे म्हणत बँकेचे माजी संचालक माधवराव पाटील यांनी सुधारित कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. आर. एम. सावंत व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होती.‘कायद्याच्या कलम ८८ अंतर्गत चौकशीचा कालावधी दोन वर्षे इतकाच आहे. त्यामुळे कायद्यानुसार, चौकशीचा कालावधी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी संपला आणि विशेष अधिकारी कोणताही निष्कर्ष काढू शकले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने २०१७ मध्ये कायद्यात सुधारणा करून हा कालावधी वाढविला. तसेच ही तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल, असेही या नव्या कायद्यात म्हटले आहे. सरकार सुधारित कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू शकत नाही. त्यामुळे सुधारित कायदा रद्द करावा,’ अशी विनंती पाटील यांचे वकील जोएल कार्लोस यांनी न्यायालयाला केली.तसेच या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत चौकशीलास्थगिती द्यावी, अशी विनंतीही कार्लोस यांनी केली. उच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत चौकशीला स्थगिती दिली. ‘जुन्या कायद्यानुसार चौकशीचा कालावधी वाढविला जाऊ शकत नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत चौकशी करू नये,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने अजित पवार यांच्यासह ६० जणांना दिलासा दिला.सुनावणी २२ नोव्हेंबरलाराज्य सरकारला याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारHigh Courtउच्च न्यायालय