शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हिजाब वादावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:08 IST

अजित पवार म्हणाले की, काही लोक हिजाब वादातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान आपल्याला जातीय आणि धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडायला शिकवत नाही. 

मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद राज्यात उमटू लागले असून महाराष्ट्रातही काही ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर समाजात आणखी फूट पडेल अशा घटना टाळायला हव्यात, असे आवाहन करतानाच काही लोक या प्रकरणात राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवार म्हणाले की, काही लोक हिजाब वादातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान आपल्याला जातीय आणि धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडायला शिकवत नाही. 

आज जग पुढे जात आहे. प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी असताना तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल याचा विचार करायला हवा. कोणी तरी एखादा व्हिडीओ व्हायरल करतो, त्यावरून दुसरा ट्विट करतो. काऊंटर ट्विट सुरू होतात आणि निष्कारण विषयाला महत्त्व दिले जाते. याबाबत सर्वांनी समंजस भूमिका घेऊन संयम ठेवला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केले.

महाराष्ट्रात अशांतता नको - गृहमंत्री वळसे-पाटील- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही कर्नाटकातील वादातून महाराष्ट्रात आंदोलन करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. - शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थेत असे वाद आणू नयेत. शैक्षणिक संस्थाचे जे नियम असतील ते सर्वांनी पाळले पाहिजेत. - दुसऱ्या राज्यातील एखाद्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन करुन समाजात अशांतता निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. - राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. सर्वांनी शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारHinduहिंदूMuslimमुस्लीम