शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

अजय-शाहरूख पुन्हा परस्परांना भिडणार

By admin | Updated: June 1, 2015 05:01 IST

बॉलीवूड कलाकार अजय देवगण याने २०१६ व २०१७ दोन्ही वर्षांच्या दिपावलीत स्वत:चे चित्रपट रिलीज करण्यासाठी बुकींग केले आहे.

मुंबई : बॉलीवूड कलाकार अजय देवगण याने २०१६ व २०१७ दोन्ही वर्षांच्या दिपावलीत स्वत:चे चित्रपट रिलीज करण्यासाठी बुकींग केले आहे. यानिमित्ताने अजयने पुन्हा एकदा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खानला आव्हान दिले आहे. आतापर्यंत दिवाळीच्या काळात ‘किंग खान’चे चित्रपट प्रदर्शित होत असे.‘शिवाय’ हा चित्रपट २०१६च्या दिवाळीत तर, २०१७मध्ये सन आॅफ सरदारचा सिक्वल रिलीज करण्याची घोषणा अजय देवगणने केली आहे. शाहरुख व अजय देवगण यांच्यातील ही स्पर्धा नवी नाही. अजयचा ‘सन आॅफ सरदार’ हा चित्रपट व शाहरुख खानचा ‘जब तक है जान’ (यशराज फिल्म्स) हा चित्रपट दिवाळीच्या कालावधीत एकाचवेळी प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी शाहरुखने आपल्या चित्रपटाचे नुकसान केले, असा आरोप अजय देवगणने केला होता. किंग खानचे कोणते चित्रपट येत्या दोन वर्षांत रिलीज होणार हे अद्याप नक्की नाही. शाहरुख सध्या तीन चित्रपट करत आहे. पहिला चित्रपट ‘दिलवाले’ असून अजयचा मित्र रोहित शेट्टी तो बनवत आहे. या चित्रपटात काजोल नायिका असून, ती अजयची पत्नी आहे. शाहरुख-काजोल ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी मानली जाते. त्याबरोबरच शाहरुखचा ‘दिलजले’ हा चित्रपट तयार होत असून , फॅन व रईस हे चित्रपटही रांगेत आहेत. फॅनची निर्मिती यशराजची असून शाहरुखने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केली आहे. हा चित्रपट येत्या आॅगस्टमध्ये रिलीज होणार होता. पण चित्रपटात व्हिएफएक्सचे बरेच काम बाकी आहे. त्यामुळे आता सप्टेंबरमध्ये बकरी ईदला रिलीज करण्यावर चर्चा सुरू आहे. शाहरुखचा तिसरा चित्रपट रईस असून , तो २०१६ साली ईदच्या मुहर्तावर रिलीज होणार आहे. मात्र, आमचे चित्रपट निर्धारित तारखानाच रिलीज होणार, असे अजयचे समर्थक म्हणत आहेत. अजय दिवाळीत जे चित्रपट रिलीज करणार आहे, त्या चित्रपटांचे शूटिंग सुरू झालेले नाही. सन आॅफसरदारच्या सिक्वलसाठी कथाही निश्चित नाही.