शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंला हवेत आता हॉटेलमध्ये कांदेपोहे

By admin | Updated: May 15, 2015 02:18 IST

वडापाव आणि गोमांसापाठोपाठ आता कांदापोहे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर दाखल झाले आहेत. राज्य शासनाच्या गोवंश हत्याबंदीला

मुंबई : वडापाव आणि गोमांसापाठोपाठ आता कांदापोहे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर दाखल झाले आहेत. राज्य शासनाच्या गोवंश हत्याबंदीला विरोध करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने हॉटेलांमध्ये कांदेपोहे मिळायला हवेत यासाठी बाह्या सरसावल्या आहेत. पंजाबी, दाक्षिणात्य खाद्यपदार्थांसोबत हॉटेलांमध्ये मराठी खाद्यपदार्थ म्हणून कांदेपोह्यांचा समावेश करावा, असे आवाहन रिपाइंने सर्व हॉटेलमालकांना केले आहे. मुंबईसह राज्यात दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. मात्र काही अपवाद वगळता कोठेच मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध होत नाहीत. यासाठी पक्षाच्या वतीने सर्व हॉटेलमालकांना आवाहन-पत्रे पाठविण्यात आल्याचे रिपाइंचे उपाध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले. ग्राहकांकडून मागणी नसते त्यामुळे कांदापोह्यांसारखे पदार्थ ठेवले जात नाहीत, असा दावा काही हॉटेलवाल्यांकडून केला जातो. मात्र, हा दावा फसवा आहे. पर्यटक आणि ग्राहकांना कांदेपाहे वा अन्य पदार्थांचा पर्यायच दिला नाही, तर कळणार कसे? पर्यटकांना पर्याय दिल्यास चव तयार होईल आणि आपोआप मागणी होईल, असा दावा पंडित यांनी केला. खाजगीच नाही, तर राज्य शासनाच्या उपाहारगृहांमध्येही मराठी खाद्यपदार्थ मिळत नाहीत. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शासकीय कार्यक्रम आणि सभारंभांमध्ये राज्याचे पारंपरिक खाद्यपदार्थ पुरविण्याचा आग्रह केला जाणार आहे. तसेच हॉटेल मॅनेजमेंटच्या महाविद्यालयांमध्ये पोह्यांचा समावेश करण्याबाबतही आवाहन करण्यात येईल, असे पंडित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)