शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:22 IST

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी गेलेली एअर होस्टेस मैथिली मोरेश्वर पाटील (वय २२) ही पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील. मैथिलीचे अवघं कुटुंब, नातेवाईक शोकसागरात बुडून गेले आहे. मैथिली आपल्यातून कायमची निघून गेली आहे, ही दुर्दैवी बाब स्वीकारण्यास ते अद्यापही तयार नाहीत.

- मधुकर ठाकूर उरण (रायगड)  - अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी गेलेली एअर होस्टेस मैथिली मोरेश्वर पाटील (वय २२) ही पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील. मैथिलीचे अवघं कुटुंब, नातेवाईक शोकसागरात बुडून गेले आहे. मैथिली आपल्यातून कायमची निघून गेली आहे, ही दुर्दैवी बाब स्वीकारण्यास ते अद्यापही तयार नाहीत. कुठेही असली तरी ती नक्कीच परत येईल, या भाबड्या आशेवर मैथिलीच्या परत येण्याकडे ते डोळे लावून बसले आहेत.

 मैथिली पाटील ही न्हावा येथे आई-वडील आणि दोन लहान भावंडांसह राहत होती. सध्या मैथिलीचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात मिळण्याच्या प्रतीक्षेत अहमदाबाद येथे आहेत.कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून आबालवृद्धांनी तिच्या घरी हजेरी लावली. मैथिली शांत, संयमी आणि मेहनती होती. तिला नृत्य, गायनाबरोबरच भजनाचीही आवड होती.  सध्या मैथिलीचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात मिळण्याच्या प्रतीक्षेत अहमदाबाद येथे आहे.

न्हावा गावातील होती पहिलीवहिली एअर होस्टेसन्हावा गावातील पहिलीवहिली एअर होस्टेस म्हणून मैथिली परिचित होती. तिने टी. एस. रेहमान शाळेत शिक्षण घेतले. यादरम्यान तिने एअर होस्टेस होण्याचे स्वप्न बाळगले.आर्थिक स्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनीही तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली. बारावीनंतर प्रतिकूल परिस्थितीत मैथिलीने एअर होस्टेसचा अभ्यासक्रम पूर्ण केला.दोन वर्षांपासून ती एअर इंडियात एअर होस्टेस म्हणून कामावर रुजू झाली होती, अशी माहिती माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी दिली.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादRaigadरायगड