शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

'मोदीजी, तुम्ही कागदपत्रं मागायला आलात, तर कब्रस्तानात घेऊन जाईन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 15:42 IST

सीएएविरोधात एमआयएमची सभा; मोदी, शहांवर थेट शरसंधान

मुंबई: मी याच मातीत जन्माला आलो आणि याच मातीत दफन होईन, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतल्या सभेत सुधारित नागरिकत्व कायद्याला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. मोदीजी, ज्या दिवशी माझ्याकडे कागदपत्रं मागायला याल, तेव्हा मी तुम्हाला माझे आजोबा, वडिलांना दफन करण्यात आलेल्या कब्रस्तानात घेऊन जाईन. तिथली माती तुम्हाला देईन आणि तुम्हाला सांगेन की हीच माझी कागदपत्रं आहेत. याच मातीत मी जन्माला आलो आणि याच मातीत मी दफन होईन, असं जलील म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काल मुंबईत एमआयएमची सभा झाली. दिल्लीतल्या शाहीन बागेत सध्या मुस्लिम महिलांचं सीएए, एनआरसीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यावर भाष्य करताना जलील यांनी मोदी सरकारला थेट इशारा दिला. आमच्या घरातल्या बुरखाधारी महिला आज रस्त्यावर उतरल्यानं तुम्हाला भीती वाटत आहे. जेव्हा हिजाब घातलेल्या महिला घराबाहेर पडतात, तेव्हा क्रांती घडते हा आमचा इतिहास आहे. आमच्या माता बहिणींनी प्रत्येक शहरात एक शाहीन बाग तयार केली आहे. आम्ही त्यांना सलाम करतो. त्यांचं सामर्थ्य एकदा आजमावून पाहा आणि जेव्हा घरातले इतर बाहेर पडतील, तेव्हा काय होईल याचा विचार करा, असं जलील म्हणाले. 'मोदीजी, अमित शहाजी तुम्ही आमच्याकडे आमच्या प्रामाणिकपणाचे पुरावे मागता. तुम्ही आमच्याकडून मशीद हिसकावून घेतलीत. तेव्हा आम्ही नाराज झालो. मात्र इतकं मोठं आंदोलन आम्ही केलं नाही. तुम्ही काश्मीरमध्ये अत्याचार केलेत. तेव्हादेखील आम्ही नाराज होतो. मात्र आम्ही आंदोलन केलं नाही. तिहेरी तलाकच्या नावाखाली तुम्ही शरियतसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केलात. तेव्हाही आम्ही नाराज होतो. मात्र इतक्या मोठ्या आंदोलनासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. मात्र आता तुम्ही या देशापासून आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केलात, तर असं वातावरण तुम्हाला संपूर्ण देशात पाहायला मिळेल, अशा शब्दांत जलील यांनी सीएएविरोधात तीव्र आंदोलन सुरुच राहील असा अप्रत्यक्ष इशारा दिला.  

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक