शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

AIMIM: राज्यात एमआयएमचा जोरदार धडाका; ५८ उमेदवार आघाडीवर, मुंबई-ठाण्यात 'पतंग' सुसाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:52 IST

AIMIM Maharashtra Results: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी सर्वांनाच चकित केले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने ११ महानगरपालिकांमध्ये आपला प्रभाव पाडत तब्बल ५८ जागांवर आघाडी घेतली.

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यभरातील ११ प्रमुख महानगरपालिकांमध्ये एमआयएमचे तब्बल ५८ उमेदवार सध्या आघाडीवर असून, मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पक्षाचे अनेक उमेदवार विजयी झाले आहेत.

निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांनुसार, मुंबईत एमआयएमचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. तर, ठाणे महानगरपालिकेत ५ उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. एमआयएमचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर असून, येथे एमआयएम मोठी ताकद म्हणून समोर येताना दिसत आहे.

या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी स्वतः मैदानात उतरून संपूर्ण राज्यात १९ झंझावाती सभा घेतल्या होत्या. या सभांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मतांमध्ये परावर्तित झाल्याचे चित्र निकालांवरून स्पष्ट होत आहे. विशेषतः मुस्लीम बहुल आणि दलित वस्त्यांमध्ये एमआयएमने महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले.

दरम्यान, एमआयएमने नांदेडमध्ये ९ जागांवर आघाडी घेतली. धुळ्यात ८ उमेदवारांने आगेकूच केली आहे. तर, अमरावती आणि नागपूर या दोन्ही शहरांमध्येही एमआयएमच्या उमेदवारांनी समाधानकारक आघाडी घेतली आहे. एमआयएमच्या या वाढत्या प्रभावामुळे पारंपारिक राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला असून, आगामी काळात स्थानिक राजकारणात एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : AIMIM Surge in Maharashtra: 58 Candidates Lead, Strong in Mumbai-Thane

Web Summary : AIMIM gains ground in Maharashtra local elections, with 58 candidates leading across key cities. Strong performances in Mumbai, Thane, and Chhatrapati Sambhajinagar challenge established political equations, signaling a significant shift in local politics.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2026Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५