शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

तीन वर्षांत एड्सने घेतले ६०३ बळी

By admin | Updated: April 10, 2017 21:34 IST

एड्स आजाराचा विळखा वाढत चालला असून गेल्या तीन वर्षांत नागपूर जिल्ह्यात साडेतीन हजारांहून

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 10 -  एड्स आजाराचा विळखा वाढत चालला असून गेल्या तीन वर्षांत नागपूर जिल्ह्यात साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. यातील ६०३  एड्सग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला. एड्सबाबत व्यापक जनजागृतीची आवश्यकता असताना दुष्परिणामांच्या प्रचार-प्रसारावर अत्यल्प खर्च होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सकांकडे ह्यएड्सह्णबाबत माहिती विचारली होती. नागपूर जिल्ह्यात १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत किती ह्यएड्सह्णग्रस्त रुग्ण आढळले, किती रुग्णांचा मृत्यू झाला, या कालावधीत किती अनुदान प्राप्त झाले व ह्यएड्सह्ण नियंत्रण मोहिमेअंतर्गत प्रचार-प्रसारावर किती खर्च करण्यात आला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१४ ते २०१६ या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत ३ हजार ७३० ह्यएड्सह्णग्रस्त आढळून आले. यातील २ हजार ३४४ रुग्ण हे सामान्य रुग्णालयात आढळून आले तर १ हजार ३८६ रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत होते. एकूण ६०३ जणांचा मृत्यू झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९५ रुग्णांचा समावेश आहे.सामान्य रुग्णालय जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला तीन वर्षांच्या कालावधीत १७ लाख ११ हजार ४३० रुपयांचे शासकीय अनुदान प्राप्त झाले. यापैकी १२ लाख ८८ हजार ९९७ रुपयांचा निधी ह्यएड्सह्ण नियंत्रण कार्यक्रमात खर्च झाला. दरम्यान, जनजागृतीसाठी ९१ हजार ५०० रुपयांचा खर्च झाला. याचाच अर्थ प्रत्येक वर्षी सरासरी ३० हजार ५०० रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्याची व्याप्ती लक्षात घेता हे प्रमाण फारच कमी असून अशाने लोकांमध्ये जनजागृती कशी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंडाऱ्यात चार तर गडचिरोलीत आठ मृत्यूदरम्यान, भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ३१ ह्यएड्सह्णग्रस्त आढळले व यातील चार जणांचा मृत्यू झाला. तर याच कालावधीत गडचिरोली जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ३०४ रुग्णांना ह्यएड्सह्णची लागण झाली व आठ जणांचा मृत्यू झाला.