मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रातही आमूलाग्र बदल होणार असून, नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’मध्ये सुधारणा होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने आयोजित ‘जागतिक परिषद २०२५’ मध्ये मुख्यमंत्री बोलत होते. जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या परिषदेतील दुबई इकॉनोमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हादी बद्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, पॅन आयआयटीचे चेअरमन देवासी भट्टाचार्य, पॅन आयटीचे शरद सराफ, अशोक झुनझुनवाला, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ही जगाची फिनटेक आणि डाटा सेंटर राजधानी होत आहे. राज्य शासन इनोव्हेटिव्ह सोसायटीसाठी प्रयत्न करीत आहे. दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.