शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील घटनेची सखोल चौकशी होईल; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 20:31 IST

दुर्घटनेवेळी आम्ही राजकारण करत नाही. जे राजकारण करत असतील ते दुर्दैवी आहेत, भारती पवार यांचं वक्तव्य.

अहमदनगर: "जिल्हा रुग्णालयातील घडलेली घटना दुर्दैवी आहे. झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होईल," असे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिले. या घटनेचे येथे राजकारण करणे योग्य नाही आणि जर कुणी राजकारण करत असेल ते चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मंत्री भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयात शनिवारी सायंकाळी पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार सुजय विखे-पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, शहराध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री भारती पवार यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा हे वादग्रस्त आहेत, या प्रश्नावर त्यांनी चौकशी करून कारवाई करू, असे सांगितले. पंतप्रधान निधीतून दिलेल्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन ही आग लागल्याच्या आमदार रोहित पवार यांनी आरोप केला होता. या आरोपाकडे लक्ष वेधले असता भारती पवार म्हणाल्या, अशा दुर्घटनेवेळी आम्ही राजकारण करत नाही. जे राजकारण करत असतील ते दुर्दैवी आहेत.

काय आहे घटना?जिल्हा सामान्य रुग्णालयातील ICU कोरोना कक्षाला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ५० ते ८५ वयोगटातील आहेत. आयसीयू कक्षामध्ये कोरोनाची लागण झालेल्या २५ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या २० जणांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली.पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे रविवारी येणार नगरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRajesh Topeराजेश टोपेSujay Vikheसुजय विखे