शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:37 IST

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस रोशनी सोनघरे हिच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस रोशनी सोनघरे (वय २७) हिच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी रामनगर परिसरातील शिवमंदिर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सात दिवसांनी रोशनीचे पार्थिव घरी आणण्यात आले. पार्थिव पाहताच आई राजश्रीसह कुटुंबाने हंबरडा फोडला. त्यांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

अहमदाबादहून १२ जूनला लंडनसाठी उड्डाण केलेल्या विमानाला अपघात झाला. यात क्रू मेंबर रोशनी हिचा मृत्यू झाला होता. एकूण २७० जणांना अपघातात प्राण गमवावे लागले. घटनेची माहिती मिळताच रोशनीचे वडील राजेंद्र आणि भाऊ विघ्नेश हे अहमदाबादला रवाना झाले होते. मृतदेह जळून खाक झाल्याने मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांची डीएनए चाचणी करण्यात येत होती. रोशनीच्या मृतदेहाची ओळख पटवायला सात दिवसांचा कालावधी लागला. बुधवारी ओळख पटवून तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी रात्री रोशनीचे पार्थिव एअर इंडियाच्या विशेष विमानातून मुंबई विमानतळावर आणण्यात आले. गुरुवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास रोशनीचे पार्थिव डोंबिवलीतील घरी आणले गेले. यावेळी कुटुंबीयांना शोक अनावर झाला. यावेळी एअर इंडियाच्या व्हाइस प्रेसिडेंट आणि केबिन क्रू हेड एन. जे. जुली आणि टाटा सन्सचे सीएफओ सौरभ अगरवाल यांच्यासह सहकारी उपस्थित होते. 

...त्याआधीच रोशनीवर काळाचा घाला प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोशनीने एअर होस्टेस होण्याचे स्वप्न जिद्द, मेहनतीने पूर्ण केले होते. लवकरच ती बोहल्यावर चढणार होती. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिचा साखरपुडा होणार होता; तर फेब्रुवारी-मार्चमध्ये लग्न होणार होते. त्यासाठी हॉलची शोधाशोध सुरू होती; पण त्याआधीच रोशनीवर काळाने घाला घातला.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाMaharashtraमहाराष्ट्रdombivaliडोंबिवली