शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash : अपघाताचे कारण ‘लॉस ऑफ लिफ्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:06 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद येथून गुरुवारी दुपारी टेक ऑफ घेताच अपघातग्रस्त झालेल्या विमानातील इलेक्ट्रीक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने विमानातील ‘प्रेशर सिस्टीम’ ड्रॉप झाली असावी. परिणामी, विमानाचे फ्लॅप अपेक्षेनुसार ३० ते ४० डीग्रीपर्यंत खाली न झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असे प्राथमिक अनुमान काढता येईल.

- कुणाल गायकवाडअहमदाबाद येथून गुरुवारी दुपारी टेक ऑफ घेताच अपघातग्रस्त झालेल्या विमानातील इलेक्ट्रीक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने विमानातील ‘प्रेशर सिस्टीम’ ड्रॉप झाली असावी. परिणामी, विमानाचे फ्लॅप अपेक्षेनुसार ३० ते ४० डीग्रीपर्यंत खाली न झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असे प्राथमिक अनुमान काढता येईल. ज्या विमानाला अपघात झाला ते बोईंग ७८७ ड्रीमलायनर हे अत्याधुनिक प्रकारात मोडते. अपघाताचे व्हिडिओ पाहाता, विमानाचे फ्लॅप वरच दिसत आहेत. खरे तर टेक ऑफच्या वेळी ते साधारण ३० ते ४० डिग्रीपर्यंत खाली असायला हवेत. पण, तसे झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे हवेचा दाब कमी होऊन पॉवर फेल आणि त्यातून ‘लॉस ऑफ’ लिफ्ट होऊन ते लगेचच कोसळले असावे. टेक ऑफ नंतर ६२५ फुटांवर असलेले हे विमान फूल थ्रोटल देऊन देखील हवेचा दाब आवश्यक तेवढा वाढवू शकले नसेल असे प्रथमदर्शनी वाटते. अर्थात, विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती आल्यावर नेमके कारण समोर येईल. 

विमानाने जास्त उंची गाठलेली नसल्याने कुठल्याही प्रकारच्या कम्युनिकेशनला वेळ मिळाला नसावा. त्यातच विमानात इंधन पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने अपघाताची तीव्रता वाढलेली दिसते. आजूबाजूला मोकळे मैदान किंवा पाणी असते तर अपघाताची तीव्रता बऱ्याच अंशी कमी झाली असती. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद