शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 23:48 IST

Ahmedabad Air India plane crash : विमान अपघातातून एक ब्रिटीश नागरिक सुखरूप बचावला आहे. याचबरोबर एवढ्या प्रचंड आगीत भगवदगीता आणि कृष्णाची मूर्ती सहीसलामत सापडली आहे.

अहमदाबादमधीलएअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. पैकी १२ जणांचे डीएनए नातेवाईकांशी जुळले असून पहिला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या विमान अपघातातून एक ब्रिटीश नागरिक सुखरूप बचावला आहे. याचबरोबर एवढ्या प्रचंड आगीत भगवदगीता आणि कृष्णाची मूर्ती सहीसलामत सापडली आहे. या दोन्ही वस्तू या पनवेलच्या लेकीच्या असल्याची मोठी शक्यता समोर येत आहे. 

या विमानात पनवेल न्हावा येथील एयर होस्टेस मैथिली पाटील ही देखील होती. एअर इंडियाची ती क्रू मेंबर होती. एअर इंडियाच्या या विमानात बहुतांश क्रू मेंबर हे महाराष्ट्रातीलच होते. यापैकीच एक मैथिली होती. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार विमान अपघातानंतर सहीसलामत सापडलेली भगवदगीता आणि बाळकृष्णाची मूर्ती ही तिची असण्याची दाट शक्यता आहे. 

मैथिलीच्या वडिलांनी आपली मुलगी कृष्णभक्त असल्याचे सांगितले आहे. श्री कृष्णाची भक्त असणारी मैथिली गेली. घरात कृष्णाची मूर्ती आणि सोबत पण, तिच्याकडे भगवत गीता देखील असायची, असे त्यांनी डोळ्यात अश्रू आणत सांगितले आहे. पप्पा एवढ्याच पगारात काय होईल आता मी बघेन, असे सांगत ती मला धीर द्यायची असेही ते म्हणाले आहेत. 

विमानाचा अपघात झाल्याचे समजल्यावर मैथिलीची आई आणि इतर नातेवाईक अहमदाबादला गेले आहेत. परंतू, तिथे कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे मैथिलीच्या छोट्या बहिणीने आरोप केले आहेत.  ताई आम्हाला नेहमी प्रत्येक गोष्ट सांगायची, यावेळी देखील तिने सर्व सांगितले होते. मला ती नेहमी तुझी नोकरी सुरक्षित आहे, असे सांगायची. पण आता नको तेच झाले, असे तिने म्हटले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाpanvelपनवेलahmedabadअहमदाबाद