शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रात साडेतीन हजार वर्षांपूर्वी केली जात होती शेती, मिळाले पुरावे; कोल्हापूरच्या संशोधकांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 18:54 IST

उत्खननात आढळली शेती अवजारे

संदीप आडनाईककोल्हापूर : गोंदिया जिल्ह्यात लोहयुगकालीन कृषी अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा प्रबंध ऑक्टोबर महिन्याच्या करंट सायन्स या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामुळे सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वीही महाराष्ट्रात शेती होत असल्याच्या पुराव्याला भक्कम आधार मिळाला आहे. मूळचे कोल्हापूरचे, पण सध्या डेक्कन कॉलेजमध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विभागात पुरावनस्पती शास्त्राचे संशोधक असलेल्या डॉ. सतीश नाईक यांनी नागपूरच्या पुरातत्त्व विभागाचे डॉ. विराग सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले आहे.गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील मल्ली येथील पुरातत्त्वीय स्थळाचे उत्खनन २०१०-११ आणि २०१२-१३ मध्ये केले होते. हे स्थळ नागपूरपासून १३५ किलोमीटर पूर्वेस चोरखंबारा या वैनगंगेच्या उपनदीच्या डाव्या तीरावर आहे. यात आद्य लोहयुगकालीन संस्कृतीचे अवशेष आढळले. याची पुष्टी वैज्ञानिक रेडिओ कार्बन डेटिंग पद्धतीने केली आहे. डॉ. नाईक यांनी मल्लीच्या उत्खननात ७९ मातीचे नमुने घेऊन जळालेल्या धान्याचे तरंगतंत्रज्ञानाद्वारे, प्रयोगशाळेत विलगीकरण करून संशोधन केले. यातून ४१७४ वनस्पतींचे अवशेष मिळाले.यात तांदूळ, वेगवेगळ्या तृणधान्य, कडधान्य, जंगली फळेवर्गीय वनस्पतींचे अवशेष आणि भात शेतीमधील तणांचे अवशेष आढळले. यात तांदळाचे प्रमाण ४८ टक्के होते. तृणधान्यांत कोडोमिलेट, सावा मिलेट, ब्राऊनटॉप मिलेट, फॉक्सटेल मिलेटस्चा समावेश होता. कडधान्यांत उडीद, मूग, कुळीथ, पावटा, लाख इत्यादी द्विदल वनस्पतींचे बी व तेलबियांत मोहरी आढळली. भात पिकाच्या तणांपैकी लव्हाळेवर्गीय वनस्पती, रिंकल ग्रास सापडले. जंगली फळांच्या बियांपैकी बोरं, वांगी मिळाली आहे. काळी मुसळी, डेफ्लावर, निळी या औषधी वनस्पतींचे अवशेषही आढळले.

उत्खननात आढळली शेती अवजारे

या प्राचीन स्थळाचा कालावधी ३४०० वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट होते. येथे आद्य लोहयुगकालीन संस्कृतीची वसाहत आणि ४०० मेगालिथस कालावधीतील मानवी दफनभूमीचे अवशेष आहेत. यात मृदभांडी, शेतीची अवजारे, विळा, कुऱ्हाडी, सुरी, अशा लोखंडाच्या वस्तूही आढळल्या आहेत.

आद्य लोहयुगापासून औषधी वनस्पतींचा वापर भारत करीत आला आहे. निळीचा उपयोग मृद भांड्यावर रंगकाम, नक्षीकामासाठी केला असावा. आयुर्वेदात आजारावरही नीळ वापरल्याचे संदर्भ आहेत. विदर्भात तांदूळ हा ताम्रपाषाण काळापासून पिकवला जातो. मल्ली हे ठिकाण अतिपावसाच्या प्रदेशात असल्यामुळे येथे तांदूळ पिकवण्यासाठी अनुकूल, पोषक हवामान मिळाले. -डॉ. सतीश नाईक, पुरावनस्पती शास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेज, पुणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधन