शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीच्या चिनी स्प्रेमुळे शेतक-यांचा जीव धोक्यात - कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 20:13 IST

कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील १८ शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी दिली.

मुंबई - कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील १८ शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी दिली. विषबाधाप्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याचेही कृषीमंत्र्यांनी यावेळी मान्य केले. विदर्भात विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे १८ शेतक-यांचा मृत्यू झाला. तर, ५४६ शेतकरी अत्यवस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कृषीमंत्री फुंडकर म्हणाले की, विषबाधेची घटना दुर्देवी आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विदर्भातील कडक उन्हामुळे पिकांवरील फवारणी करताना शेतकरी अनेकदा मास्क किंवा कोट न घालताच फवारणी करतात. त्यातच चिनी बनावटीचे स्प्रेने फवारणी करताना शेतक-यांच्या अंगावरच किटकनाशकाचा फवारा येतो आणि विषबाधा होते, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. मात्र, विषबाधेच्या या प्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याचेही कृषीमंत्र्यांनी मान्य केले. गेल्या काही दिवसांपासून विषबाधेमुळे अनैसर्गिक मृत्यू होत असल्याची बाब पोलिसांना किंवा जिल्हा प्रशासनाला माहिती नव्हती. शिवाय, यवतमाळ जिल्हत सोय असतानाही रुग्णांना उपचारांसाठी नागपूरला पाठविण्यात आले. नागपूरातील सरकारी रूग्णालयातील उपचारादरम्यान रूग्णांना बाहेरून औषधे आणि रक्त तपासणीचे अहवाल आणण्यास सांगण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल. या प्रकरणातील शेतक-यांना कोणत्या कृषी केंद्रावरुन किटकनाशकांचा पुरवठा झाला, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले होते का, याची चौकशी केली जाईल. या दुर्घटनेत किटकनाशक कंपन्या जबाबदार असल्याच त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे फुंडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकरGovernmentसरकार